शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शिक्षण धोरण सर्वांसाठी अडचणीचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:42 IST

चंद्रशेखर मराठे : सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिका

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणातही परिवर्तनाची गरज होती, म्हणून १९७५ नंतर बऱ्याच मोठ्या काळानंतर आलेल्या नवीन शिक्षण धोरणाकडून खूप अपेक्षा होत्या. पण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण संस्थांच्या दृष्टीने विचार केला तर या धोरणात प्रस्तावित केलेले बदल कसे अंमलात आणायचे याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीविषयी विशेषतः ११वी, १२वीबाबत गोंधळाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सतीश प्रधान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी केले.

समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या उद्घाटनावेळी प्राचार्य मराठे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, मोठ्या महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांबाबत काय धोरण असेल, याबाबत संदिग्धता आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सोयीसवलती या धोरणात स्पष्ट नाहीत. अशा रीतीने हे नवीन शिक्षण धोरण अनेक अंगाने सर्वांसाठी अडचणीचे आहे. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, ‘सगळा देश लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त असताना, संसदेत चर्चा न करता घिसाडघाईने आदेश काढून मंजूर केलेले हे शिक्षण धोरण मुळातच लोकशाहीच्या संकेताविरुद्ध लागू केले गेले आहे. संविधानानुसार शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सामायिक आहे. परंतु यापुढे ही तरतूद रद्द करून शिक्षणाच्या केंद्रीकरणाचा संविधानविरोधी घाट घातला जाणार आहे.’ 

उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल nनव्या धोरणात नमूद केल्याप्रमाणे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा, ऑनलाइन अभ्यासाचा वापर हा या सरकारच्या खाजगीकरणाला उत्तेजना देण्याच्या व्यापक धोरणाचाच एक भाग आहे. मोठ्या उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नफेखोरीच्या प्रवृत्तीने शिक्षण सामान्य माणसांच्या कुवतीबाहेर जाईल. nशिक्षणात आधीच पुढे असलेला समाज त्यांना सहज उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांमुळे आणखीन पुढे जाईल आणि मुळातच आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेला वंचित समाज या सोयीसुविधा घेण्याची ऐपत नसल्याने व शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे राखीव जागा निरर्थक ठरणार असल्याने शिक्षणातून बाजूला पडेल आणि अजूनच मागे जाईल, अशी सार्थ भीती वाटते.