शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांतील अनागोंदी : वाढीव कामाला नवा कंत्राटदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:16 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रेंगाळल्यामुळे वाढीव खर्चाची कामे त्याच ठेकेदाराला न देता त्यासाठी नव्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेऊन पुन्हा निविदा मागवण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

- नारायण जाधवठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रेंगाळल्यामुळे वाढीव खर्चाची कामे त्याच ठेकेदाराला न देता त्यासाठी नव्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेऊन पुन्हा निविदा मागवण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. याचे उल्लंघन केल्यास संबधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.राज्यातील अनेक नगरपालिकांसह महापालिका नव्याने वाढलेली विकासकामे विद्यमान ठेकेदाराला विनानिविदा देऊन टक्केवारी आणि ठेकेदारीचे राजकारण करीत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीने अलीकडेच निदर्शनास आणली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या नगरविकास विभागाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाधुंद कारभारास वेसण घातली आहे.या आदेशाचा फटका राजधानी मुंबईसह राज्यातील नागरीकरण झालेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदरसह नजीकच्या वसई-विरार आणि पनवेल महापालिकेतील वाढीव विकास कामांमध्ये मलाई खाणाºया लोकप्रतिनिधींसह अधिकारी आणि ठेकेदारांना बसणार आहे. सध्या राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये अमृत, सुवर्ण जयंती नगरोथ्थानसह स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी अंतर्गत अब्जावधीची कामे सुरू आहेत. यात रस्ते, मलवाहिन्या, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे करताना अनेक स्थानिक स्वराज्य संस्था एकदाच त्यासाठी स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेची प्रशासकीय तांत्रिक मान्यता घेऊन करीत होती. यात वाढीव कामे अनेकदा आहे त्याच ठेकेदाराला विनानिविदा देत होती. यात मोठ्या प्रमाणात टक्केवारी आणि ठेकेदारीचे राजकारण रंगत असे. यात तांत्रिक अनियमितता होऊन मोठा गैरप्रकार होत असल्याचे लोकसमितीने आपल्या २८ व्या अहवालात निदर्शनास आणले आहे. त्यानंतर नगरविकास विभागाने नव्याने हे आदेश काढले आहेत.असे आहेत आदेशमूळ प्रशासकीय मंजुरीच्या आदेशात समाविष्ट असलेल्या व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांनाच निविदेत समावेश करावा. तसेच मंजूर कामांच्या प्रत्येक घटकाचा निविदेत समावेश करावा. शिवाय निविदेत समावेश असलेल्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांचा समावेश करू नयेत. सक्षम अधिकाºयाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेशिवाय निविदा प्रसिद्ध करू नयेत.केंद्रीय दक्षता आयोगाच्यानिर्देशांचे पालन करावे.कार्यादेश देण्यापूर्वी वित्तीय औचित्याचे पालन करावे.वाढीव कामांचा समावेश करून कार्यादेश देऊ नयेत. असे उघड झाल्यास संबधित अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.रस्ते, इमारतींचे बांधकाम करतांना पीडब्ल्यूडीच्या निर्देशांचे पालन करावे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या