शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर भाजप कार्यकारणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान

By सदानंद नाईक | Updated: July 22, 2023 17:24 IST

उल्हासनगर भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रदीप रामचंदानी यांची निवड झाल्यावर, त्यांचे शनिवारी शहर जिल्हा कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले.

उल्हासनगर - नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांचे भाजप जिल्हा कार्यालयात आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, लाल पंजाबी आदींच्या उपस्थितीत भव्य स्वागत झाले. यावेळी त्यांनी शहर कार्यकारणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान देणार असल्याचे संकेत दिल्याने, जुन्या स्थानिक नेत्यांची कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रदीप रामचंदानी यांची निवड झाल्यावर, त्यांचे शनिवारी शहर जिल्हा कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, लाल पंजाबी यांच्यासह मनोहर खेमचंदानी, डॉ प्रकाश नाथानी, प्रकाश माखिजा, किशोर वनवारी, राम चार्ली पारवानी, राजू जग्यासी, डॉ एस बी सिंग, दीपक छतलानी, मंगला चांडा, अर्चना करणकाळे, अश्विनी माधवी आदीसह पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे आक्रमक असल्याने, त्यांची शहर कार्यकारणी त्याच तोलामोलाची असणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहर कार्यकारणीत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या नेत्यांची गच्छंती निश्चित असल्याचे समजले जात आहे. 

भाजपच्या जिल्हा कार्यालयातील स्वागत कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी लवकरच शहर कार्यकारणी घोषित करणार असल्याचे संकेत दिले. तसेच कार्यकारिणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान देणार असल्याचे ते म्हणाले. मात्र शहर जिल्हाकार्यकरणीत वर्षानुवर्षे पदे अडवून बसणाऱ्या स्थानिक नेत्यांची त्यामुळे कोंडी झाली आहे. तसेच शहरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून भविष्यात शहरात क्रमांक एकचा पक्ष असेल, असेही रामचंदानी म्हणाले आहेत. रामचंदानी यांच्या निवडीचे सर्वाधिक स्वागत भाजप कार्यकर्ते व तरुण पदाधिकार्यांनी केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर