शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीची मालकी संरक्षण खात्याकडेच

By admin | Updated: June 27, 2017 03:18 IST

नेवाळीच्या जागेवर संरक्षण खात्याचीच मालकी असून त्या जागेचा सात-बाराही त्यांच्याच नावे असल्याची माहिती महसूल खात्याती

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या जागेवर संरक्षण खात्याचीच मालकी असून त्या जागेचा सात-बाराही त्यांच्याच नावे असल्याची माहिती महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. आधी ही जागा अधिग्रहित केली होती. नंतर तिचा मोबदला चुकता करून तिचे संपादन करण्यात आले. जमिनीचा मोबदला दिल्याने त्यावर संरक्षण खात्याची मालकी आहे. त्यामुळे या जमिनी परत करण्याचा मुद्दा गैरलागू असल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. या जमिनीत झालेले फेरफार, त्यावर बिल्डर-चाळ माफियांनी केलेली अतिक्रमणे नव्याने तपासली जाणार असून संरक्षण खात्याच्या जमिनीत घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या जमिनीचा सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर नाही. त्यामुळे तो कोरा करण्याच्या मागणीत तथ्य नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ब्रिटीश सरकारने १९३९ सालच्या डिफेन्स अ‍ॅक्टद्वारे नेवाळी परिसरातील १,६७६ एकर जागा आधी अधिग्रहीत केली होती. पण नंतर ५०८ शेतकऱ्यांना चार लाख ७८ हजार १०७ रुपये नुकसानभरपाई देऊन तिचे संपादन केले. नुकसानभरपाई दिल्याची यादी महसूल खात्याकडे आहे. कल्याण-डोंबिवलीत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी द्वारली, भाल, पिसवली, आडीवली ढोकळी ही गावे धावपट्टी बाधित गावे आहेत.शेतकरी संस्थेचा पाठिंबा : ठाणे : नेवाळीतील आंदोलक शेतकऱ्यांना ठाणे परिसर शेतकरी संस्थेने पाठिंबा दिला आहे. सरकारने ही जमीन सध्याच्या बाजारभावानुसार नव्याने संपादित करावी आणि त्यात भूमीहीन होणाऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन किंवा टीडीआर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चाळ माफियांचे अतिक्रमणनेतिवली, पिसवली, नांदिवली येथे जागा शिल्लक नाही. नांदिवली, पिसवली, भाल, द्वारली, वसार आणि नेवाळी येथे चाळ माफियांनी चाळी उठवल्या आहेत. पण त्या अतिक्रमणांवर पोलीस, संरक्षण दल आणि महसूल विभागाने काहीही कारवाई केलेली नाही आणि शेतकऱ्यांनीही त्याविरोधात कधी आवाज उठविलेला नाही. याचिका प्रलंबितच : नेवाळीतील जागा शेतकऱ्यांना परत करण्यासाठी जमीन बचाव आंदोलन समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १३ जूनला सुनावणी होणार होती. पण याचिका बोर्डावर आलीच नाही. तसेच त्यावर पुढील सुनावणीची तारीख मिळालेली नाही. या मुद्द्यावर १७ जणांनी विविध याचिका दाखल केल्या असून त्यांचे स्वरुप एकच आहे. अडीच कोटीचा भाव : नेवाळीत एक गुंठा जमिनीला सहा लाखांचा भाव सुरु आहे. एक एकर जमिनीत ४० गुंठे असतात. ते पाहता एकराचा भाव साधारणत: २ कोटी ४० लाखांवर जातो. एवढा भाव मिळत असल्यानेच संरक्षण खात्याकडून वापरात नसलेली जमीन शेतकऱ्यांना परत हवी आहे.