शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील नेताजी उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:10 IST

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

उल्हासनगर : शहरातील उद्यान व उद्यान दुरूस्ती, नूतनीकरणासाठी ३ कोटीच्या निधीची तरतूद करूनही उद्यानाची दुरवस्था झाली आहे. नेताजी उद्यानाचे काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.उल्हासनगरातील उद्यानाची दुरूस्ती, नूतनीकरणावर कोटयवधींचा निधी खर्च करूनही त्यांची दुरवस्था झाली. कॅम्प नं-५ येथील चांगल्या स्थितीतील नेताजी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने सुरू केले. नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण करून लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत. मात्र इतरत्र खोदून ठेवल्यामुळे दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री प्रयत्न करत आहेत. मात्र उद्यानाचे काम अर्धवट टाकले कसे? या प्रश्नाचे उत्तर बांधकाम विभागाकडे नसून वाढीव निधीसाठी उद्यानाचे काम थांबल्याची चर्चा आहे.नेताजी उद्यानाच्या नूतनीकरण व दुरूस्तीवर दोन वर्षापूर्वी लाखो रूपये खर्च केला होता. तसेच खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी खेळणी बसवणे, झाडे लावणे, बसण्यासाठी सिमेंटची बाकडे बसविण्यात आली. मात्र जुन्याच कामावर नवीन बांधकाम झाल्याचे दाखवल्यावर उद्यानाचे काम वादात सापडले. राज्य सरकार व महापालिकेकडून नूतनीकरण व दुरूस्तीसाठी प्रत्येकी ३ कोटी असा एकूण ६ कोटींच्या निधीची तरतूद केली होती. सकाळ-संध्याकाळ हजारो नागरिक ज्या नेताजी उद्यानाचा वापर करतात त्याची दुरूस्ती व नूतनीकरणाऐवजी व्हीनस चौकातील रस्त्यावर तसेच गोलमैदानच्या जागेत कोटयवधींचा निधी खर्च करून लहानसे उद्यान विकसित केले.सत्ताधारी गप्पशहरातील उद्यानाची दुरूस्ती व नूतनीकरणावर तब्बल ६ कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र मुख्य उद्यानावर खर्च करण्या ऐवजी नवीन उद्याने विकसित करून कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपसह शिवसेना, साई पक्ष, ओमी टीमच्या नगरसेवकांनी याबाबत मूग गिळून गप्प आहेत.निधीअभावी कामबंदनेताजी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम ६ महिन्यांपूर्वी सुरू केले. नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण करून लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली. मात्र याव्यतिरिक्त इतर कामांसाठी निधी अपुरा पडला असून निधी उपलब्ध होताच उद्यानाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर