शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरुग्ण वसाहतीतील दवाखान्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:59 IST

जानेवारीत पडझड : केडीएमसीच्या भोंगळ कारभाराचा फटका

कल्याण : पूर्वेतील कचोरे परिसरातील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीत असलेल्या दवाखान्याच्या वास्तूची पडझड झाली आहे. त्यामुळे जागेअभावी फेब्रुवारीपासून शेजारील शाळेलगतच्या सभागृहात कुष्ठरुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, अजूनही दवाखान्याची दुरुस्ती करण्यासाठी अजूनही केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही. राज्यमंत्र्यांचे पत्र तसेच वैद्यकीय विभागाने दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

हनुमाननगर येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत १६० कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५९ रुग्णांचे दिव्यांगांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. अशा कुष्ठरुग्णांना दररोज मलमपट्टी करावी लागते. अन्यथा, रुग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाऱ्या जंतंूमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो.कुष्ठरुग्णांची वाढती संख्या पाहता केडीएमसीने १९९३ मध्ये येथे एक स्वतंत्र दवाखाना उभारला. तेथे कुष्ठरुग्णांवर उपचार होत असत. परंतु, या दवाखान्याची आता जीर्ण अवस्था झाल्याने पुरती पडझड झाली आहे. त्यामुळे त्याची त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा स्लॅब कधीही कोसळण्याची भीती आहे. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दवाखान्याची पडझड झाली. तेव्हापासून खबरदारी म्हणून हा दवाखाना शेजारच्या केडीएमसीच्या राजगुरू विद्यालयालगत असलेल्या सभागृहात हलवण्यात आला आहे. दवाखान्याची पडझड झाली तेव्हा त्याची डागडुजी करावी, अशी मागणी हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केडीएमसी आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच यासंदर्भात आयुक्तांना पत्र द्यावे, अशी विनंतीही त्यांनी चव्हाण यांना केली होती. त्यावर चव्हाण यांनी आयुक्तांना ६ फेब्रुवारीला पत्र पाठवून काम तातडीने करण्याबाबत आदेशही दिले होते. परंतु, अजूनही दवाखान्याची डागडुजी झालेली नाही. दरम्यान, डागडुजीसाठी त्याचा आराखडा तयार करून त्यासंबंधीचा प्रस्ताव वैद्यकीय आरोग्य विभागाने बांधकाम विभागाकडे पाठवलाही आहे.

दवाखान्याची धोकादायक स्थिती आयुक्त गोविंद बोडके यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती. तेव्हा त्यांनीही तातडीने दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. दुसरीकडे आॅगस्टमध्ये महापौर विनीता राणे यांनीही या वसाहतीला भेट दिली. त्यावेळी दवाखान्याची दुरवस्था त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती. पण, अद्याप कार्यवाही झालेली नाही. यावरून दवाखान्याच्या पडझडीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे....तर भीक मागून निधी देऊ : केडीएमसीने आम्हाला वाºयावर सोडले आहे. महापालिकेकडे निधी नसल्यास आम्ही तो भीक मागून जमा करून देऊ, पण दुरुस्तीचे काम झाले पाहिजे, अशी भावना कुष्ठरुग्णांची झाली आहे, असे परखड मत गायकवाड यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. दरम्यान, यासंदर्भात बोडके यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणे