शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा वीजपुरवठा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर!, डिजिटल स्कूलसाठी प्रशिक्षकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:28 IST

ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला.

ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला. मात्र वीजबील रखडल्यामुळे बहुतांशी शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी दिले. या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अखेर गावातील शाळांच्या वीज पुरवठ्यासह वीज भरण्याची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात प्रथमच ठाणे जि.प.च्या शाळा डिजिटल झाल्याची घोषणा राज्यपाल ठाणे जिल्हा दौºयात करणार होते. सुमारे ७७ शाळांचा वीज पुरवठा खंडीत असल्याचे वृत्त दरम्यान प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत आता गावातील शाळांच्या सुरळीत वीज पुरवठ्यासह वीज बिलाची रक्कम व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील ४३० शाळांवर ठाणे जिल्हा परिषदेने सोपवली आहे. हा निर्णय नुकताच घेतल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.वीज बीलाची रक्कम थकवल्यामुळे शाळांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने वेळोवेळी केली आहे. यामुळे सुमारे दोन-दोन वर्षे शाळेत लाइट, पंखे बंद व संगणक एलसीडी प्रोजेक्टरदेखील धूळ खात पडून होते. यास ठाणे जिल्हा परिषदेचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचा आरोप तत्कालीन आ. रामनाथ मोते यांनी केला आहे. यामुळे डिजिटल शाळांचे भवितव्य अल्पजीवी ठरण्याची भीती आहे.>वीजबिलांच्या रकमेची तरतूदच नाहीकल्याण पं.स.च्या कार्यकक्षेतील वीज पुरवठा खंडीत केलेल्या ७७ शाळांचे १७ लाख ७२ हजार १४३ विजेचे बिल थकल्याने येथील वीजेचे मीटर काढून नेल्याने वीज पुरवठा खंडीत होता. यामुळे ९७ शाळांमधील संगणक धूळखात पडून होते.शाळांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासह त्यांच्या वीज बिलांच्या रकमेसाठी तरतूद न करताच ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला आहे; पण आता वीज बील भरण्याची जबाबदारी ग्राम पंचायतींवर टाकली आहे. त्या विरोधातही काही शिक्षक बंड पुकारण्याच्या प्रयत्नात असून, प्रशिक्षक दिल्याशिवाय मुलांना डिजिटल शिक्षण देता येणार नसल्याचे लेखीसुद्धा काही संघटनांनी जि.प.ला दिले आहे.