शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:28 IST

देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

डोंबिवली : देशाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा सारख्या नेतृत्वाची गरज आहे. या देशाचे अखंडत्व टिकले पाहिजे. देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे मुंबई विभागाचे राष्ट्रीय अधिवेशन व प्रचार सभा रविवारी होरायझन सभागृहात झाली. या वेळी चव्हाण बोलत होते. समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबरला पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम झाला.या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे, संस्था समन्वयक संजय पाखले, विजयकुमार वाणी, कैलास वाणी, राजेश कोठावदे, अनिल चितोडकर, अजय मालपुरे, निलेश पूरकर, आर. एल. वाणी, शामकांत शेंडे, शशिकांत येवले, अभय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, सगळ्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने समाजाने हे अधिवेशन घेतले आहे. ग्रामीण भागातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिवेशनाचा लाभ होणार आहे. तसेच या अधिवेशनाद्वारे देशाला चांगला पंतप्रधान कसा लाभला पाहिजे हे एक सत्र घेतले तर त्यांचा फायदा पुढच्या पिढीला होईल. देशाला मार्गदर्शन ठरू शकतील, अशी पाच वर्षे तुम्हाला आणि आम्हाला ठरवायची आहेत. तो निर्णय चुकला तर अडचणी येऊ शकतात. आपण सर्वांनी ‘भारतमाता की जय’ या मंत्राबरोबर चालणे गरजेचे आहे.खा. शिंदे म्हणाले, कल्याण व डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर वाणी समाज आहे. या सर्वांना अधिवेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम होत आहे. वाणी समाज हा व्यवसाय करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, मराठी माणूस आता सर्व व्यवसायात आहे. मराठी माणसाला ती ओळख वाणी समाजाने करून दिली आहे.आदिशक्तीला कमी लेखू नकाआमदार भोईर म्हणाले, महिलांची खरी ताकद या अधिवेशनात दिसून येणार आहे. चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम महिलांमध्ये आहे. त्यामुळे आदिशक्तीला कमी लेखण्याचे काम करू नका. सर्वपक्षीय नेते येतात तेव्हा भरभरून देण्याची ताकद असते. तुमच्या सर्व मागण्या तिथे पूर्ण होतील. मी आमदार म्हणून अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली