शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाची प्रतिष्ठापना करण्यासह वारकऱ्यांसाठी योजना राबवण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:04 IST

येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाºयांना त्यांनी जिल्हा बँकांसाठी व्यवसायीक उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे बँकेतील रोजचे वातारण सांप्रदायीक आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. अधिकारी, पदाधिकारी आणि अधिकाºयांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील, यामुळे बँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाही. परमेश्वर कृपेने बँकेची उन्नती होईल,

ठळक मुद्दे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापनाबँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाहीपांडुरंगाच्या भाविकांसाठी सुरू होणाऱ्यां  पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज

सुरेश लोखंडेठाणे : राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी त्यांच्या मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित आहे. याशिवाय पंढरीच्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणाना आर्थिक पाठबळ देणारी योजना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी सुरू करण्याची गरज आहे. यामुळे पांडुरंगाचे स्मरणही होत राहील आणि बँकांची उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ठाणे येथे व्यक्त केली.येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी जिल्हा बँकांसाठी व्यवसायीक उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे बँकेतील रोजचे वातारण सांप्रदायीक आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. अधिकारी, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील, यामुळे बँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाही. परमेश्वर कृपेने बँकेची उन्नती होईल, असे देखमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा बँकांनी वारकरी संप्रदायासाठी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. राज्यातील भाविकाना पांडुरंगाचे दर्शन घेणे शक्य व्हावे, त्यासाठी उद्भवणारी त्यांची आर्थिक चणचण दूर व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकांनी पंढरपूर तीर्थयात्रेला जाणाऱ्यां भाविकांसाठी कर्ज योजना हाती घेऊन त्यांना आर्थिक पाटबळ देण्याची गरज देखमुख यांनी व्यक्त केली.पांडुरंगाच्या भाविकांसाठी सुरू होणाऱ्यां  पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज योजनेमुळे यामुळे बँकांची उन्नती होऊन उत्तरोत्तर प्रगती होईल आणि भाविकांचे पंढरपूर वारीही पूर्ण होण्यास मदत होईल असेही देखमुख यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले. या दौऱ्यांप्रसंगी त्यांनी टीडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन शेतकरी कर्जमाफीसह बचत गटांच्या कामही राज्यात टीडीसीसीचे उत्तम असल्याचे त्यांनी नमुद केले. ठेवीच्या तुलनेत बँकांनी कर्जांचे अधिकाधिक वितरण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अन्यही पदाधिकऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकारच्या विविध विषयांवर त्यांची यावेळी चर्चा केली.

टॅग्स :thaneठाणेbankबँकstate bank chowkस्टेट बँक चौक