शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफचे जवान आता होणार ठाण्यातील घोडबंदरनिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:42 IST

पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी मुंबईकरांसह ठाणेकरांना राष्ट्रीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ प्राप्त झाले आहे.

सुरेश लोखंडेठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी मुंबईकरांसह ठाणेकरांना राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ प्राप्त झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात त्यांच्यासाठी ठाणे महापालिकेकडून (टीएमसी) घोडबंदर या निसर्गाच्या सान्निध्यात खास निवासव्यवस्था केली. मुंबईच्या अंधेरी येथील लष्कराच्या छावणीत राहणे पसंत करणाऱ्या एनडीआरएफ पथकाने घोडबंदरला नापसंती दर्शवली होती. मात्र, ठाणेकरांच्या प्रेमापोटी त्यांनी घोडबंदरला निवासी येण्यास तयारी दर्शवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या अतिलोकवस्तीच्या परिसरांत पावसाळ्यात जीवघेण्या आपत्तीच्या संकटांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. यावर वेळीच मात करून संकटग्रस्तांना त्वरित मदतकार्य करून पाठबळ देणे शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके अंधेरीच्या लष्करी छावणीत तैनात केले आहेत. १२० जवानांच्या या तीन पथकांतील एक पथक ठाणे येथील घोडबंदर परिसरात वास्तव्यास ठेवण्याची विनंती ठाणे महापालिकेने केली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्यास यश मिळाले. मात्र, एनडीआरएफचा होकार येण्यास विलंब झाल्यामुळे दुखावलेली ठाणे महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय त्यावर काय निर्णय घेणार, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागून आहे.आपत्तीप्रसंगी धावून जाणारएनडीआरएफचे जवान घोडबंदरला निवासी राहिल्यास त्यांना ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी संभाव्य आपत्तीप्रसंगी सहज धावून जाता येणार आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतही त्यांना अल्पावधीत पोहोचता येईल.पण, अंधेरी येथे निवासी राहिल्यास एनडीआरएफच्या १२० जवानांचे पथक ठाण्यासह परिसरात पोहोचण्यास सुमारे अर्धा तास लागणार आहे. अंधेरीच्या छावणीतील लष्करी तुकडीत ५८ जवान सक्रिय आहेत. त्यांना मदतकार्यासाठी ठाण्यासह परिसरात येण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागणार आहे.वाहतूककोंडी असल्यास आपत्तीस्थळी येण्यास विलंब लागू शकतो. यावर वेळीच मात करण्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या सहमतीने त्यांची घोडबंदरला निवासव्यवस्था करणेच अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या