शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंड टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:44 IST

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.

ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गत आठवड्यात हाती घेतले. हे काम साधारणत: दोन महिने चालणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. अतिशय रहदारीचा हा मार्ग बंद केल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. ठाणे शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा मुद्दा उचलून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर यांच्यासह शहर कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि आनंदनगर (मुलुंड) टोलनाक्यावरील वसुली थांबवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी मागणी पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेऊन टोलनाके खुले करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलन सुरू करण्यात आले. टोलवसुलीसाठी थांबवलेली वाहने या आंदोलनामुळे टोल न घेताच सोडण्यात आली. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ऐरोली, शीळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. मात्र, या पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यासाठी शासन जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी या वेळी केला.>पालकमंत्र्यांवर आरोपबायपास दुरुस्तीच्या कालावधीमध्ये वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी ऐरोली किंवा मुलुंडपैकी एकच टोलनाका सुरू राहील, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा हवेतच विरल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही टोल मान्य नसून बायपासचे काम सुरू होईपर्यंत येथील वसुली होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षाचे आंदोलन सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे येथून मार्गस्थ झाले. मात्र, त्यांनी आंदोलनाबाबत साधी विचारपूसही केली नाही. हे माणुसकीहीनतेचे लक्षण असल्याचा आरोपही आव्हाड यांनी या वेळी केला.>यापुढे गनिमी काव्यानेटोल बंद करूमुंब्रा बायपास अतिशय धोकादायक झाला होता. या बायपासचे काम सुरू होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील वसुली पक्षाचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. आजचे आंदोलन करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर इशारा दिला होता. मात्र, यापुढे टोलवसुली बंद न केल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी या वेळी दिला.