ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असतानाच आक्षेपार्ह बॅनर लावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्यासह आठजणांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका झाली.घोडबंदर रोडवरील सेंट झेव्हियर्स शाळेच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने एक बॅनर लावला. पोलीस किंवा पालिका प्रशासनाची परवानगी न घेताच लावलेला बॅनर आक्षेपार्ह असून आचारसंहितेचा भंग करणारा असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. आचारसंहिता भंग व शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी बॅनरचे मुद्रक आणि प्रकाशक राष्ट्रवादीचे प्रभाकर सावंत यांच्यासह हा बॅनर तयार करणारा आणि ते लावणारे कामगार राजेश शिंदे, गुडू बिंद, जामवंत बिंद, मुकेश शर्मा, संतोष बिंद अशा आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. यातील सावंत यांना शुक्र वारी अटक करण्यात आली. त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या आठ जणांना अटक
By admin | Updated: January 28, 2017 02:45 IST