शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कळवा-मुंब्य्रासाठी राष्ट्रवादीत चुरस

By admin | Updated: January 19, 2017 22:57 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असे काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केले

जितेंद्र कालेकर,

ठाणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असे काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केले असले तरी कळवा मुंब्रा भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वबळावर लढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे एकेका प्रभागासाठी अनेकांनी मुलाखती देऊन नेत्यांसमोर पेच निर्माण केला आहे.येथील एका खासगी हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी १० ते ११ प्रभाग १ ते ५, त्यानंतर ११ ते १२ वा. च्या दरम्यान ६ ते ११ प्रभागांचे त्यानंतर इतर प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात विद्यमान नगरसेवकांनीही पुन्हा आपले नशीब अजमविण्यासाठी पार्लिमेंटरी बोर्डाससमोर मुलाखती दिल्या. सर्वाधिक गर्दी होती ती कळवा आणि मुंब्रा भागातूनच. कळव्याच्या प्रभाग क्रमांक ३१ या संजयनगर, कोळीवाडा या ३१ क आणि ब मध्ये अलिकडेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले राजन आणि अनिता किणे या नगरसेवक दाम्पत्यासह राजन यांचे भाऊ मोरेश्वर, नगरसेवक महेंद्र कोमुर्लेकर असे ११ जण इच्छुकांच्या रांगेत आहेत. तर ३१ ब या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागात अनिता किणे आणि रेश्मा पाटील यांच्यासह आठ महिलांनी मुलाखती दिल्या. ३१ अ मध्ये मात्र अवघ्या दोन महिलांनी प्रतिसाद दिला. प्रभाग ३२ ब मध्ये तीन महिला, क मध्ये ७ आणि ड मध्ये आठ जणआपले नशिब अजमविण्यास इच्छुक आहेत. अशीच परिस्थिती चर्नीपाडा प्रभाग ३३ ब, क आणि ड मध्ये आहे. ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने तिथे ५, ब मध्ये ४ महिला उमेदवारांनी तयारी दर्शविली आहे. तर ड मध्ये पाच जण उत्सुक आहेत. किस्मत कॉलनी या प्रभाग ३० मध्ये विद्यमान नगरसेवक सिराज डोंगरे यांच्यासह आठ जणांना निवडणूक लढवायची आहे. याशिवाय, ३०-अ आणि ब मध्ये प्रत्येकी तीन तर ३०-ड मध्ये चौघांनी मुलाखत दिली. शीळ डायघर येथील इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेल्यानंतर अटक झालेले नगरसेवक हिरा पाटील आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्यासह तिघांनी २९ अ साठी तयारी दर्शविली. २९- ब मध्ये एकमेव महिला असून २९-क मध्येही तीन महिला आहेत. प्रभाग २५ क आणि ड मध्येही प्रत्येकी पाच जणांनी मोर्चेबांधणी केली. विटाव्याच्या प्रभाग २४ अ, क आणि ड या तीन जागांसाठीही अनुक्रमे चार, सहा आणि आठ जण इच्छुकांच्या रांगेत होते. >विद्यमान नगरसेवकांसाठी इच्छुकांची माघारप्रभाग एक ते आठ मध्ये घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, शास्त्रीनगरसाठी प्रत्येकी एक ते तीन इच्छुक होते. शहरातील करवालोनगर किसननगर वगळता सर्वच प्रभागांमध्ये एक किंवा दोघेच इच्छुकांच्या रांगेत होते. एकेका प्रभागासाठी अनेकांनी मुलाखती देऊन नेत्यांसमोर पेच निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकांसाठी इच्छुकांनी आपल्या इच्छेवर पाणी सोडल्याचे चित्र पहायला मिळाले.