शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून, शहरात बैलगाडी आंदोलन केले. तर ...

ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून, शहरात बैलगाडी आंदोलन केले. तर महिलांनी शासकीय विश्रामगृहाजवळ चुलीवर स्वयंपाक करून तर तरुणांनी सायकल चालवून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाजवळ हे आंदोलन शनिवारी पार पडले.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे या दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्‍या पेट्रोल, डिझेलच्या किमतीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ''मोदी फेकतो डोळ्यात धूळ-रिकामे सिलिंडर पेटते चूल''; ''तेल का खेल-मोदी सरकार फेल''; भाजप की नियत झुटी है- महंगाई फिर से लौटी है''; ''सिलिंडर हुआ-८०० पार-कहाँ हो मोदी सरकार''; ''हर रोज किंमत बढाओगे-अच्छे दिन कब लाओगे''; वाह रे मोदी तेरा खेल - महंगा डिझेल- महँगा तेल; मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणा देऊन केंद्र शासनाच्या कारभाराचा पाढाच वाचला.

या आंदोलनात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्यासह सुरेखा पाटील, प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

..................