शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलास अटक, लॅपटॉप, मोबाइल फोन हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:28 IST

बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात पोलीस चौकशीस टाळाटाळ करणारा नामवंत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वकिलास ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात पोलीस चौकशीस टाळाटाळ करणारा नामवंत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वकिलास ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली.मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदा पद्धतीने काढणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जानेवारी महिन्यात केला. या प्रकरणी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह ११ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव समोर आले. नवाजुद्दीनचे त्याच्या पत्नीसोबत वैयक्तिक वाद होते. या वादातून त्याने पत्नीच्या मोबाईल फोनचा सीडीआर पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीच्या मदतीने मिळवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी नवाजुद्दीनला नोटीसही बजावली होती. नोटीस बजावून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी नवाजुद्दीनने चौकशीसाठी अद्याप ठाणे पोलिसांकडे हजेरी लावलेली नाही. उलटपक्षी ट्विट करून त्याने त्याच्याविरूद्धच्या आरोपांवर संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी नवाजुद्दीनचा वकील रिझवान सिद्दीकी याच्यासह नवाजुद्दीनच्या पत्नीलाही चौकशीसाठी नोटीस बजावली होती. शुक्रवारी रात्री या प्रकरणी वेगाने घडामोडी झाल्या. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या झडतीमध्ये पोलिसांनी लॅपटॉप आणि अ‍ॅड. सिद्दीकी यांचा मोबाइल फोनही हस्तगत केला.>अनेक अभिनेते गुंतल्याच्या चर्चेला दुजोरासीडीआर प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्री गुंतले असल्याची चर्चा सुरुवातीपासून होती. अ‍ॅड. सिद्दीकी यांच्या अटकेनंतर या चर्चेला दुजोरा मिळत आहे. अ‍ॅड. सिद्दीकी हे चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेत्यांचे वकील आहेत. त्यांच्या चौकशीतून नवाजुद्दीनप्रमाणे आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.