शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 05:44 IST

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील गुलजार अल्लावक्ष पाशा (२४) याला ठाणे गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली.

ठाणे : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील गुलजार अल्लावक्ष पाशा (२४) याला ठाणे गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून मेथएम्फाटामाइन नावाच्या अमली पदार्थाच्या १२८ गोळ्या हस्तगत केल्या असून त्यांची किंमत तीन लाख २० हजार रुपये इतकी असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी शहरात गस्त करताना गुरुवारी सायंकाळी राबोडीत जाणाºया सर्कलजवळ एक तरुण मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी या पथकाने त्यास हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने तो नवी मुंबई, कोपरखैरणे रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहत असल्याचे सांगितले.याचदरम्यान त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे गुलाबी व नारंगी रंगांच्या एकूण १२८ मेथएम्फाटामाइन या अमली पदार्थाच्या गोळ्या मिळून आल्या. आणखी सखोल चौकशी केल्यावर त्याने त्या गोळ्या पार्टी ड्रग्जकरिता विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्या गोळ्यांसह मोटारसायकल व इतर मुद्देमाल असा तीन लाख ७० हजार ८०० रुपयांचा एकूण ऐवजजप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ व औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ८ (क) २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने केली.