शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:28 IST

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. यात मेट्रोसह सीएसटी ते पनवेल उन्नत उपनगरीय मार्गासह जलवाहतुकीचा समावेश आहे. यात जलवाहतुकीच्या मार्गात असलेला खारफुटीचा मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. कारण, करावे आणि शहाबाज येथील सुमारे ०.४६ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनखात्याने मान्यता दिली आहे. यामुळे आता केवळ कांदळवन कक्षाची परवानगी मिळताच नेरूळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचा सिडको आणि मेरिटाइम बोर्डाचा मार्ग मोकळा होणार आहे.महसूल आणि वनखात्याने ठाणे जिल्ह्यातील करावे येथील सर्व्हे क्रमांक २६१ अ व ३०६ वरील राखीव वनांची ०.४४ हेक्टर आणि शहाबाज येथील सर्व्हे क्रमांक ५०० वरील कांदळवनाची ०.०२ हेक्टर जमीन सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे जेट्टी बांधण्यासाठी वळती केली आहे. यानुसार, प्रकल्प यंत्रणा अर्थात सिडको आणि मेरिटाइम बोर्डाने नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तींचे पालन करून जेट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात करायची आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारत सरकारच्या २५ सप्टेंबर २०१७ आणि १३ फेबु्रवारी २०१८ च्या पत्रातील नियमांनुसार ते करावे, कांदळवन कक्षाच्या प्रमुखांनी त्यांची खात्री करावी, असेही अपर मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आपल्या पत्रात सिडकोस बजावले आहे.>सिडकोचा सुटकेचा नि:श्वासमुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडायचे की, सायन-पनवेल हायवेचे रुंदीकरण करून जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका,न्हावा-शिवडी सी-लिंकची उभारणी करून लवकरात लवकरप्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्याचे उपाय शोधले असतानासर्वांत स्वस्त, कमी खर्चीक व जलद असा हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे.सध्या नवी मुंबई ते मुंबईदरम्यान असलेली रस्तेवाहतूक दिवसेंदिवस तापदायक ठरत आहे. रेल्वेवरही ताण पडत आहे. परंतु आज-उद्या सुरू होणार, असे म्हणत गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सिडकोस पडला होता. परंतु, आता खारफुटीची जमीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.