शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: March 26, 2017 04:22 IST

मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी

राजू काळे / भार्इंदरमीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांसह काही नगरसेवक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरले आहे.शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाअभावी भरकटला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाने त्यातील अचूक प्यादे आपल्या पटावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच राष्ट्रवादीच्या अनिता पाटील व वंदना पाटील या दोन नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ध्रुवकिशोर पाटील व सुरेश खंडेलवाल हे भाजपात जाणार असल्याचे वृत्त ‘मॅरेथॉनच्या आडून प्रवेशाची तयारी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. तसेच जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना हसनाळे-शिंदे, नगरसेवक रवींद्र माळी हे सुद्धा भाजपात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ध्रुवकिशोर व मोहन पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. सध्या ते गणेश नाईक गटाचे समर्थक मानले जातात. मोहन यांना पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवणक तसेच त्यांच्या शाळेतील काही वाद मिटवण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे. ध्रुवकिशोर व खंडेलवाल या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात अमराठी राहत असल्याने ‘सबका साथ सब का विकास’च्या कमळात विराजमान होणे पसंत केले आहे. ज्योत्स्ना, खंडेलवाल हे गिल्बर्ट मेंडोन्सा गटाचे मानले जातात. मेंडोन्सा यांनी ज्योत्स्ना यांना २००४-०५ मध्ये महापौरपदी विराजमान करण्यासाठी पक्षातील त्यावेळच्या महापौर निर्मला सावळे यांना पक्षातून काढले. त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदे देऊनही केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक रवींद्र माळी यांनी सुरुवातीला शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तडजोडीत भाजपा सरस ठरले. राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रेही भाजपात जाणार आहेत. राष्ट्रवादीचे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी रविवारी भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे आतापासूनच मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात होणार हे स्पष्ट झाले आहे.

ज्यांना स्थानिक नेतृत्वाने मोठे केले, त्यांनी तरी किमान पक्षांतर करणे बरोबर नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ स्वार्थासाठी पक्षांतर केले जात आहे. -बर्नड डिमेलो, गटनेते, राष्ट्रवादी

भाजपात सध्या इच्छुकांची मांदियाळी सुरू आहे. निवडणुकीच्यावेळी इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होणार आहे. त्यावेळी मात्र पक्षातील आयारामांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे.- प्रकाश नागणे, प्रवक्ते