शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

By admin | Updated: March 16, 2017 02:53 IST

ठाण्यातील झोपडीधारक, दुकानदार, व्यावसायिक, लघुउद्योजक, चाळकरी, हौसिंग सोसायटी, गाळेधारक आणि घरांना जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन

ठाणे : ठाण्यातील झोपडीधारक, दुकानदार, व्यावसायिक, लघुउद्योजक, चाळकरी, हौसिंग सोसायटी, गाळेधारक आणि घरांना जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसुलांतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्या नियमबाह्य असून गरिबांवर अन्याय करणाऱ्या असल्याची भूमिका घेत ठाणे शहर राष्ट्रवादीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि कार्यालय आवारात ठिय्या दिला. पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. या निवेदनावर येत्या १५ दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिला.गरिबांकडून जबरदस्तीने वसूल केला जाणारा हा जिझिया दंड कदापी भरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्यानेच शासनाकडून अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेवर आसूड ओढले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने हे आंदोलन छेडले होते. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीच्या पाचपाखाडी भागातील कार्यालयापासून आंदोलनाला सुरवात झाली. त्यात शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक, रहिवासी आणि व्यापारी सहभागी होते. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या देण्यात आला. प्रशासकीय यंत्रणा ही लोकशाही मार्गाने कार्यरत आहे किंवा नाही? याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रम आहे. शासनाकडून प्रशासकीय हुकुमशाहीचा अनुभव येत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. शासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांविरोधात जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दमदाटी केली जात असून जप्तीची कारवाई करु, असे धमकावले जात असल्याचा आरोप पराजंपे यांनी केला. शासनाचा एखादा निर्णय जनहिताविरोधात असेल तर जनमताचा कौल घेतला जातो. परंतु येथे असेही होतांना दिसत नाही. त्यामुळे हा जाचक जिझिया कर मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ही मागणी शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. येत्या १५ दिवसात यावर तोडगा निघाला नाही, तर मात्र जिल्हाधिकारी कार्यलयाला घेराव घातला जाईल, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीने दिला. (प्रतिनिधी)