शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय  लोक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:54 IST

ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी

ठळक मुद्देराष्ट्रीय लोक लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्येप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज

ठाणे : जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र असलेले खटल्यांवर सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी ९ मार्च रोजी होणारे हे लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार आहे. याचा लाभ मोठ्यासंख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करण्याचे आवाहन सर्व पक्षकारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम आर देशपांडे यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना कोणतीही समस्या असेल व इतर चौकशी करायची असल्यास त्यांनी वाशी, नवी मुंबई, भिवंडी , कल्याण, मुरबाड , शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी ठिकाणच्या न्यायालयातील विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधवा. या शिवाय काय समस्या व लोक न्यायालयाशी संबंधीत काही माहिती हवी असल्याच पक्षकारांनी येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा २२-२५४७६४४१ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय