शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांनी दिले डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 18:18 IST

मालमत्ता कर वसुली करण्याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत ५०० कोटी रुपये वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देब्लॉक निहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी जाहीर करानवीन मालमत्तांची कर आकारणी २५ डिसेंबर पर्यंत करा

ठाणे - मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.                       मंगळवारी झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आयुक्तांनी मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा आढावा घेतानाच डिसेंबर अखेर वसुली उद्दीष्टाच्या ८४ टक्के म्हणजेच जवळपास ५०० कोटी रूपये वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे सक्त निर्देश दिले. मंगळवारी अखेर अंदाजे ३०२ कोटी मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित उद्दीष्टाच्या ५० टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ४.७५ लक्ष मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आली असून त्यापैकी जवळपास २.६६ लक्ष ग्राहकांनी आपला मालमत्ता कर भरला आहे. उर्वरीत २.०९ लक्ष लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.                 त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राध्यान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्याबाबतही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची कर आकारणी २५ डिसेंबर पर्यंत करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही २५ डिसेंबर अखेर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. पाणी पट्टी वसुलीबाबत बोलताना आयुक्तांनी प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता यांनी एकित्रतपणे डिसेंबर अखेर ८० टक्के वसुली करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त