शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 17:40 IST

'उत्सव ७५' च्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे शहरात ठाणे महानगरपालिका व शहरातील सामाजिक संस्थांच्या विद्यमाने 'उत्सव ७५' या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्र प्रदर्शन, नृत्य, बाईक रॅली, मॅरेथॉन, बालनाट्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा अशा विविधांगी कार्यक्रमाच्या माध्यमातून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव ७५ चे स्वागताध्यक्ष व माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्‌या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, मनिष जोशी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी श्रीपाद भालेराव, ॲङ स्वाती दिक्षीत, निकिता भागवत आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेदरम्यान उत्सव ७५ या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या उत्सव ७५ शहरात राबविण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे.

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी 'मान्यवर ठाणेकर नागरिकांच्या मुलाखती', 'नृत्य, 'कवी संमेलन' 'क्रांतीकारकाच्या यशोगाथा' 'संगीत जागरण' 'कराओके' कार्यक्रम, 'कम्युनिटी 'ठाणे टॉक' 'रन फॉर नेशन' ही १० कि.मी. ची 'सायकल रॅली' 'पाककला स्पर्धा' 'स्वातंत्र्यलढयात ठाण्याचा सहभाग' 'माहितीपट' १४ ऑगस्ट २०२२ ला रात्री १२ वाजता शहरातील विविध ७५ ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येणार आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वा. होणार आहे. या उपक्रमात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव ७५ चे स्वागताध्यक्ष माजी महापौर नरेश म्हस्के व अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक महितीसाठी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हात नाका येथे 'उत्सव ७५' च्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा http://utsavthane.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा तसेच विनोद शर्मा 9820403748, व श्रीपाद विनोद 8097132799 यांचेशी व्हॉटसॲप मेसेजवर संपर्क साधावा असे आवाहन ठाण्यातील सर्व संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणेShiv Senaशिवसेना