शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या नाट्यगृहाला कलाम यांचे नाव देणार

By admin | Updated: September 5, 2015 22:32 IST

लिका हद्दीतील चेकनाका परिसरात नुकतेच भूमिपूजन पार पडलेल्या नियोजित नाट्यगृह नामकरणाच्या नाट्यावर शुक्रवारच्या (४ सप्टेंबर) महासभेत भाजपाने मांडलेला दिवंगत माजी राष्ट्रपती

भार्इंदर : पालिका हद्दीतील चेकनाका परिसरात नुकतेच भूमिपूजन पार पडलेल्या नियोजित नाट्यगृह नामकरणाच्या नाट्यावर शुक्रवारच्या (४ सप्टेंबर) महासभेत भाजपाने मांडलेला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव अखेर बहुमताने मंजूर करण्यात आल्याने पडदा पडला आहे. मात्र, कलाम यांच्याविषयी आदर असल्याचे सांगून शिवसेनेने दादा कोंडकेंच्या नावाचा आग्रह कायम ठेवला आहे.तत्पूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेनेने महासभेत विषयान्वये गोषवारा तसेच कोणताही प्रस्ताव नसल्याने रीतसर प्रस्ताव आणण्याच्या मुद्यावर विरोधकांना सहकार्य करून भाजपाविरोधात मतदान केले होते. त्या वेळी सभेत अनुपस्थित भाजपा सदस्यांना आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार गटनेते शरद पाटील, स्थायी सभापती प्रशांत केळुस्कर यांनी मोबाइलवर संपर्क साधून सभागृहात उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे सभागृहात भाजपाची सदस्य संख्या वाढत असतानाच केळुस्कर यांनी नियोजित नाट्यगृहाला कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. याअगोदर ३० आॅगस्ट झालेल्या नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी मेहता व महापौर गीता जैन यांनी पत्रके वाटून नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे आवाहन केले होते, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान मात्र महापौरांनी आपल्या भाषणात अचानक कलाम यांचे नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी करून नामकरणाच्या राजकारणाला सुरुवात केली होती. त्यात बदल होऊ नये, यासाठीच भाजपाने शुक्रवारच्या महासभेत कलाम यांच्या नावाचा पालिका अधिनियमातील ‘ज’ अन्वये प्रस्ताव आणला होता. कलाम यांचा आदर करून शिवसेनेने भाजपाच्या नामकरण प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यासाठी नगरसेविका मंदाकिनी गावंड यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवून त्यात एकमताने नामकरणावर शिक्कामोर्तब करण्याचा ठराव मांडला होता. विरोधकांसह शिवसेनेतील अनुपस्थित सदस्यांमुळे ठराव दोन मतांनी मंजूर झाला. नावाचे राजकारण केल्याचा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे.