शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नळपाणी योजनेला ‘जलयुक्त’चे बळ

By admin | Updated: June 8, 2015 04:24 IST

पाण्याची समस्या सोडवून ग्रामस्थांचे दु:ख कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेला आता जलयुक्त शिवार अभियानातून ताकद देण्यात येत आहे.

कर्जत : तालुक्यात मांडवणे ग्रामपंचायतीमध्ये शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल आणि मृदू संधारणाची कामे सुरु आहेत. पाण्याची समस्या सोडवून ग्रामस्थांचे दु:ख कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेला आता जलयुक्त शिवार अभियानातून ताकद देण्यात येत आहे. २०१३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या आणि दोन वर्षे काम सुरु असलेल्या नळपाणी योजनेच्या पूर्णत्वासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.साधारण ८० घरांची वस्ती असलेल्या मांडवणे गावासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. ५० लाख रु पये खर्चाच्या या योजनेमध्ये उद्भव विहीर, जलकुंभ, अशुद्ध जलवाहिनीअंतर्गत जलवाहिन्यांचा अंतर्भाव होता. मोठ्या प्रमाणात घरगुती नळजोडण्या आणि सार्वजनिक स्टँड पोस्टवर नळ असे नियोजन असलेली ही योजना अनेक महिने धीम्या गतीने पुढे जात आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. मात्र नळपाणी योजनेच्या कामामध्ये सातत्य नसल्याने वेळेत ही योजना पूर्ण होऊ शकली नाही.त्यामुळे मांडवणे गावाची निवड ज्यावेळी जलयुक्त शिवार अभियानासाठी झाली त्यावेळी या नळपाणी योजनेला गती देण्याचा निर्णय जलयुक्त शिवार अभियानाचे कर्जत तालुक्याचे मुख्य समन्वयक उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी घेतला. याबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला ही योजना पूर्ण होण्यासाठी यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या या योजनेचे पेज नदीवर मुख्य उद्भवाच्या ठिकाणी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. गावामध्ये ४० हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ पूर्ण झाले असून उद्भव विहिरीपासून जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहेत. वीज जोडणी करण्यात आल्याने गावातील अंतर्गत जलवाहिन्या फिरविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नळपाणी योजना सुरु होऊ शकते. ठेकेदार कंपनीने तत्काळ गावातील नळजोडण्या टाकून सार्वजनिक स्टँड पोस्ट तसेच घरोघरी नळ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या जोडण्या टाकण्याचे काम जलदगतीने केल्यास मांडवणे येथील रहिवाशांना नळपाणी योजनेचे पाणी अल्पावधीत मिळू शकते. (वार्ताहर)