शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये नालेसफाईला सुरुवात

By admin | Updated: May 11, 2017 01:52 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे यंदा नालेसफाईच्या सुमारे २ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारच्या

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे यंदा नालेसफाईच्या सुमारे २ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नालेसफाईची डेडलाईन १० जून ठरवल्याचे स्वच्छता विभागाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले. शहरात कच्चे व पक्के असे एकूण १५७ नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई मेच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होणे अपेक्षित असते. यंदाही काहीशा विलंबाने नालेसफाईला सुरूवात होणार आहे. स्थायीने मंजुरीपूर्वी प्रशासनाने तत्कालिन महासभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचे सोपस्कार पार पाडले. त्यामुळे नालेसफाईसाठी आवश्यक निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षी पुरेशा निधीवरून नालेसफाईला विलंब झाला होता. यंदा मात्र अगोदरच आवश्यक निधीवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अंदाजित केला आहे. त्यात बोटीसह व बोटीखेरीज प्रत्येकी २ व सहा पोकलेन मशीन, ४ जेसीबी, १६ डंपर, २ टोरस, प्रत्येकी एक हायड्रा व क्रेन मशीन, ४५० ते ५०० मनुष्यबळाच्या खर्चाचा समावेश आहे. महिनाभर चालणाऱ्या सफाई मोहीमेसाठी १० जूनची डेडलाईन निश्चित केली आहे. नालेसफाईवर कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक व प्रभाग अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहणार आहे. त्याचा दैनंदिन अहवाल उपायुक्तांना सादर करावा लागणार आहे. आशापुरा कंस्ट्रक्शन कंपनी, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता व मुकादम यांची बैठक घेत त्यांना नालेसफाईबाबतचे निर्देश दिले. तसेच दैनंदिन सफाई मोहीमेतंर्गत प्रत्येक मशीनसह मनुष्यबळ व कामाची नोंद करणे बंधनकराक केले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.