शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

उल्हासनगर महापालिकेवरच नेला जनाजा, कबरस्थानच्या जागेचा प्रश्न पुन्हा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:46 IST

उल्हासनगर : दफनभूमीसाठी जागा मंजूर झाल्यानंतरही तेथे कबरस्थान होत नसल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने गुरूवारी महापालिकेच्या प्रवेशद्बारावर जनाजा आणत ठिय्या आंदोलन केले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासमवेत मुस्लिम नागरिकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. याप्रश्नी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.उल्हासनगरच्या ...

उल्हासनगर : दफनभूमीसाठी जागा मंजूर झाल्यानंतरही तेथे कबरस्थान होत नसल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने गुरूवारी महापालिकेच्या प्रवेशद्बारावर जनाजा आणत ठिय्या आंदोलन केले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासमवेत मुस्लिम नागरिकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. याप्रश्नी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.उल्हासनगरच्या कॅम्प एक परिसरातील साबिरा खान यांचा गुरूवारी मृत्यू झाला. शहरात कब्रस्थानला मंजुरी आहे. पण ते प्रत्यक्षात न आल्याने दफनविधीला परवानगी नाही. त्यामुळे मृतदेह घेऊन कल्याण किंवा अंबरनाथला दफनविधीसाठी जावे लागते. त्यामुळे संतापलेल्या मुस्लिम समाजाने जनाजा थेट पालिकेच्या प्रवेशद्बारावर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. या प्रकाराने महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले. काही नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर मुस्लिमांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसोबत चर्चा केली आणि तातडीने कब्रस्थानसाठी जागा देण्याची मागणी केली. तेव्हा नवीन शहर विकास आराखड्यासंदर्भात ६ फेबु्रवारीला राज्यमंत्र्याकडे बैठक असल्याचे सांगून आयुक्तांनी त्यांना तेथे चर्चेचे निमंत्रण दिले. जोवर नव्या विकास आराखडयाला सरकारची मंजुरी मिळत नाही, तोवर कब्रस्थानलाही जागा मिळणार नसल्याचे आयुक्तांनी लक्षात आणून दिले.दफनभूमीसाठी समाजाचा ३० वर्षांचा लढाशहरात मुस्लिमांची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. मात्र कब्रस्थान नसल्याने दफनविधीसाठी त्यांना कल्याण किंवा अंबरनाथला जावे लागते. गेल्या २५ ते ३० वर्षापासून मुस्लिमांनी कब्रस्थानची मागणी लावून धरली. दोन वर्षापूर्वी म्हारळ गावाशेजारील दोन एकरांचा भूखंड तसेच कॅम्प नं-५ येथील स्मशानभूमीजवळील जागा कब्रस्थानसाठी देण्यात आली.म्हारळचा भूखंड रिजन्सी कंपनीने पालिकेला हस्तातरित केल्यावर कब्रस्थानची जागा मुस्लिम संघटनेकडे देण्याची तयारी सुरू होती. त्याचदरम्यान अन्सारी नावाच्या तरूणाचा मुत्यू झाला. अंबरनाथ आणि कल्याण येथील कब्रस्थान समितीने त्या तरूणाचे दफन आपल्या परिसरात करण्यास नकार दिला.तेव्हा संतप्त मुस्लिमांनी त्याचा जनाजा महापालिकेसमोर आणून ठेवला. दफनविधी करण्यास परवानगी दिली नाही, तर त्याला महापालिकेसमोर दफन करण्याचा इशारा दिला होता. तसाच प्रकार गुरूवारी घडला.अंत्यसंस्काराच्या जागेचा तिढा कायमचशहर विकास आराखड्यापूर्वी म्हारळच्या नियोजित कब्रस्थानाच्या जागेत पोलीस संरक्षणात अन्सारी यांच्यासह दोघांचे दफनविधी झाले. त्यानंतर हा प्रश्न न्यायालयात गेला. तेव्हा पालिकेने तेथे दफन करण्यास परवानगी नाकारली.कॅम्प नं-५ येथील हिंदू स्मशानभूमीजवळीत कब्रस्थानचा प्रश्नही असाच लटकला आहे. नव्या शहरविकास आराखड्यात सम्राट अशोकनगर येथील शाळा, रहिवासी विभाग व कॅम्प नं-५ येथे हिंदू स्मशानभूमी व कब्रस्थानची नियोजित जागा आहे. नव्या आराखड्यात म्हारळ गाव व शहाड येथील एका कंपनीच्या जागेत कब्रस्थान दर्शवण्यात आले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका