शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील नाका मजुरांवर रोजगाराअभावी उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:26 IST

कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे व्यवसाय बंद; हाताला काम नसल्याने आदिवासी भागांत मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी

डहाणू : डहाणू तालुक्यात कोरोना काळात बांधकामासह इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने, नाक्यानाक्यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून या मजुरांच्या हाताला काम नाही. शिवाय सरकारच्या विविध विभागामार्फत होत असलेली रोजगार हमीची कामे देखील होत नसल्याने आदिवासी भागात मनरेगाच्या कामाची मागणी होत आहे.डहाणू तालुक्यातील डहाणू, वाणगाव, चिंचणी, चारोटी अशा ठिकाणच्या बाजारपेठांच्या नाक्यावर, बेरोजगार तरुण कामाच्या शोधात जमा होत असतात. तेथून गरजू मालक त्यांना मालवाहक मोटारीवर हमाली, बांधकाम बिगारी, रेती, खडी, मुरूम मातीच्या ट्रकवर हमाली, आदी कामासाठी त्यांना नेत असतात, मात्र कोरोना संसर्गामुळे, बाजारपेठेत मंदी आल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नाका मजुरांच्या हाताला काम नसल्याने या मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. डहाणू वाणगाव रेल्वेस्थानक आणि बस स्थानकात, शेकडो नाका मजूर येऊन दररोज कामासाठी उभे राहत असतात. तेथून ते प्लंबिंग, रंगारी, सफाई कामगार, लाकूड कटाई, भात कापणे, गवत कापणी, मासेमारी, फर्निचर, वीटभट्टी, अशा विविध कामासाठी जात असतात.शहरांतही जाता येत नसल्याने चिंताकोरोना प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा बंद आहे. यामुळे या मजुरांना शहरांत रोजगारासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना घरी परतावे लागत असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.डहाणूत केंद्र सरकारने २० जून १९९१ च्या अधिसूचनेनुसार, कोणताही उद्योग उभारण्यास बंदी घातलेली असल्याने आम्हाला कायमस्वरूपी काम मिळत नाही, त्यामुळे आम्हाला काम मिळवण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन नाक्यावर उभे राहावे लागते, पण मंदीमुळे कामाला कोणी बोलवत नसल्याने घरी परतावे लागत आहे.- कृष्णा पटारा, मजूर