शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:12 IST

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. मात्र, या अभियानाचे काम करण्यास राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नकार दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे, अशी माहिती येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागात हे अभियान फसल्यात जमा असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.या अभियानातील पथकामधील अंगणवाडी कार्यकर्तीने दररोज ५० घरांना भेटी देऊन तापाची तपासणी करणे, गरज पडल्यास इतर सुविधा देणे याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रोकोविड, कोविड व पोस्टकोविड आदींचे मार्गदर्शन करावयाचे सूचित केले आहे.सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या अभियानाचे काम करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे रोजचे नियमित आहारवाटप, लसीकरण, वजन घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो, माहिती अपलोड करणे आणि दहा दिवस पोषण महिना साजरा करणे आदी कामे करावी लागणार आहेत. याशिवाय सॅम या कुपोषित बालकांच्या घरी प्राधान्याने भेटी द्याव्या लागणार आहेत. पण अंगणवाडी कर्मचारी या माणूस आहेत, रोबोट नाहीत, त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना वेळ द्यावाच लागतो. याकडे महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.दैनंदिन काम सांभाळून १२ तास तपासणी कशी करणार?अंगणवाडी सेविकांत ५० ते ५५ वयोगटातील संख्या मोठी आहे. ब्लडप्रेशर, मधुमेहाने त्या त्रस्तही असू शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी, सौम्य झालेली असू शकते. त्यांना या अभियानाद्वारे रोज ५० गृहभेटींना पाठवून कसे चालेल? इतर सर्व विभागांनी ५५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना कोविडसंबंधी कामांतून वगळलेले आहे. मग महिला बालकल्याण विभाग याचा विचार करणार की नाही? अंगणवाडी सेविकांना ५० गृहभेटी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका गृहभेटीसाठी सुमारे २० मिनिटे म्हणजेच ५० गृहभेटी पूर्ण करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. म्हणजे, त्यांना नित्याचे काम व पोषण आहाराचे काम सांभाळून, सुमारे १० ते १२ तास विनामूल्य काम करावे लागेल, त्यामुळे या अभियानाचे काम करणे हे त्यांच्यासाठी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.५० घरांना भेटी दिल्यानंतर बालकांना संसर्गाची भीतीकोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कंटेनमेंट झोन रोज वाढत आहेत, अशा कठीण जोखमीच्या अवस्थेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५० घरांना भेटी दिल्यावर पुन्हा अंगणवाडीत नियमित कामे करावयाची म्हटले तर छोटी मुले, गरोदर व स्तनदा माता या अतिसंवेदनशील गटात त्यांना मिसळावे लागेल. जर या गटाला अंगणवाडी कर्मचाºयांमुळे संसर्ग लागलाच तर जबाबदार कोण? स्थानिक जनतेच्या रोषाचा पहिला बळी अंगणवाडी कर्मचारी ठरतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस