शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माझा करार भाजपाशी, पाचही वर्षे सत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:33 IST

इदनानी यांचा दावा : शिवसेनेच्याही अपेक्षा

उल्हासनगर : ओमी टीमशी पटत नसल्याने भाजपाने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याने पुढील काळात साई पक्ष या सत्तेत असेल की नाही, याबाबत तर्क लढवले जात आहेत. मात्र साई पक्षाचा भाजपासोबत करारनामा झाला आहे. मी इतरांना ओळखत नाही, एवढीच सावध प्रतिक्रिया पक्षप्रमुख जीवन इदनानी यांनी दिली. त्याचवेळी सत्तांतरापूर्वी शिवसेनेचे सत्तेतील स्थान काय, हे आधी ठरवावे लागेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी व्यक्त केली.उल्हासनगर महापालिकेतील भाजपाच्या सत्तेत जशी ओमी टीम होती. तसाच साई पक्षही आहे. या सत्तेला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच साई पक्षाने शहर विकासाचा प्रश्न उपस्थित करून सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यामुले त्या पक्षाची समजूत काढण्यासाठी आणि सत्ता वाचविण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना थेट मुख्यमंत्र्याची भेट घालून दिली. साई पक्षाचे बंड थंड होत नाही, तोच ओमी टीममधील नाराजी बाहेर पडली. त्याचीच परिणती भाजपा-शिवसेनेच्या युतीत झाली.कल्याण- डोंबिवलीतील महापौरपदाची निवडणूक पार पडताच उल्हासनगरात सत्तांतर होईल, अशी स्पष्ट कल्पना भाजपाच्या नेत्यांनी दिल्याने ओमी टीममध्ये अस्वस्थता पसरली. साई पक्षाच्याही अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच साई पक्षाने सावध पवित्रा घेत भाजपासोबत करार झाला आहे. त्यामुळे आम्ही इतर पक्षांना ओळखत नाही. आम्ही पाचही वर्षे सत्तेत असू, असे सांगत शिवसेनेबाबत भाष्य करण्यास नकार दिला. पालिकेतील सत्तांतरापूर्वी सत्तेतील शिवसेनेचे स्थान ठरवावे लागेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चद्रंकात बोडारे यांनी व्यक्त केली.ओमी-टीम वेगवेगळीभाजपासोबत महाआघाडी केल्यानंतर ओमी कलानी यांच्या टीमच्या सदस्यांना त्या पक्षाने भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे ते सध्या भाजपाचे नगरसेवक आहेत. त्यांना पक्षाचा व्हिप लागू होतो. त्यामुळे ओमी यांच्याकडे अधिकृतपणे एकही नगरसेवक नाही. स्वत: पंचम कलानी याही भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्याने त्याही भाजपाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे ओमी आणि त्यांची टीम वेगवेगळी झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर