ठाणे : हजेरी शेडवर काम करणारे कर्मचारी उशिराने येतात अशा तक्रारी आल्याने मंगळवारी प्रभाग क्र. १२ च्या स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे यांनी येथील कामांच्या ठिकाणी अचानक पाहणी केली. त्यावेळी ही तक्रार खरी असल्याचे उघडकीस आले. या कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी आणि त्यांनी कामावर वेळेत हजर राहावे, अशी मागणी त्यांनी घनकचरा विभागाकडे केली आहे. कचरा उचलला जात नाही, कामगार वेळेवर कामावर हजर नसतात, साफ सफाईकडे दुर्लक्ष आदींसह इतर तक्र ारी येथील रहिवाशांनी वचारे यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी त्यांनी येथील विविध भागांचा अचानक पाहणी दौरा केला. त्यात त्यांना काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. कचराळी तलाव ,सिद्धेश्वर तलाव येथील शहीद उद्यानाला भेट देऊन सकाळी तेथील जॉगींगला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातही प्रभागातील ठाणो महापालिकेच्या कचरा पेढीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही त्यांनी मोर्चा वळविला. त्यावेळी त्यांची चांगलीच तांराबळ उडाली. सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या कर्मचाऱ्याची ड्युटी सुरु होते. परंतु, ७.३० वाजले तरी कामाला सुरु वात न झाल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी पालिकेकडे केली. तसेच यावेळी त्यांनी ठेकीदारीवर काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. त्यातही होळीला आठवडा होऊन सुद्धा रस्त्यावरील विझलेल्या होळीची राख उचलली गेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच कचराळी तलाव जवळील उघड्यावर पडणारा कचरा तत्काळ उचलला जात नसल्याने त्याची दुर्गंधी पसरल्याने तेथील सोसायटीच्या परिसरात व शुद्ध हवा घेण्यासाठी कचराळी तलावात आलेले तेथील नागरिकांचा त्रास ही बाब त्यांनी संबंधित विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सिद्धेश्वर तलाव व गणेशवाडी परिसरातील गटारे कशा पद्धतीने साफ होतात. याचीही पाहणी त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
हजेरी शेडवरील कामगार गैरहजर
By admin | Updated: March 22, 2017 01:26 IST