शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन प्रक्रियेतून जावेच लागेल, बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:54 IST

सुधाकर देशमुख : बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय, पूर्ण दंड भरलेल्यांना मिळणार सूट

उल्हासनगर : बांधकामे नियमित करण्यासाठी सर्वांना आॅनलाइन प्रक्रियेतून जावेच लागणार, असा पवित्रा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. यापूर्वी बांधकामे नियमित करण्यासाठी सादर केलेल्या २२ हजार प्रस्तावधारकांनाही दिलासा नसून ज्यांनी पूर्ण दंडाची रक्कम भरली, अशा ८३ जणांना मात्र आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून सूट दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे प्रक्रियाच वादात सापडली आहे. अध्यादेशाचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम राबवून अर्ज दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले.मात्र, राजकीय नेत्यांनी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी सरकारकडे केली असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, ८८५ प्रकरणांतील ४० बांधकामांना पाडकाम कारवाईच्या नोटिसा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची तयारी दर्शविल्याचे आयुक्तांनी सांगितले.शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश २००६ मध्ये लागू झाल्यानंतर फक्त ९८ बांधकामे नियमित झाली. तर, २२ हजार प्रस्ताव अद्याप धूळखात आहेत. त्यातील अनेकांनी टप्प्याटप्प्यांनुसार दंडाची रक्कम पालिकेकडे जमा केली. तसेच पूर्ण रक्कम भरलेल्या ८३ जणांना आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून आयुक्तांनी वगळले आहे. ज्यांनी अर्धी व टप्प्याटप्प्यांनी दंडाची रक्कम भरली, त्यांनाही आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे आयुक्त म्हणाले.महापालिकेत धूळखात पडलेल्या २२ हजार प्रस्तावांची नव्याने छाननी करून नियमात बसतील, अशांची बांधकामे नियमित करावीत तसेच ज्यांचे प्रस्ताव अर्धवट असतील, त्यांचे पुन्हा नव्याने प्रस्ताव मागवून बांधकाम नियमित प्रक्रियेत ठेवण्याची मागणी होत आहे.मुदतवाढीसाठी खासदारांचे प्रयत्नआतापर्यंत १० टक्के नागरिकांनीही अध्यादेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही. सर्वांना अध्यादेशाचा लाभ मिळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर