शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:48 IST

मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत.

- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाज समाधानी आहे.मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. त्यानुसार ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर पाच दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील धार्मिक कार्य पूर्ण करु न मतदानाला कधी, कसे जायचे ही समस्या किमान महाराष्ट्रातील मतदारांना तरी भेडसावणार नाही. त्यामुळे मतदानाच्या तारखांबाबत राज्यातील मुस्लिम समाज समाधानी आहे. ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यादरम्यान मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनीही विनाकारण या बाबीचा उहापोह न करता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी केले आहे.रमजान महिना सुरु होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु देशातील ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यामध्ये मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनी लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. तारखांबाबत नाहक गाजावाजा करु नये.- हजरत मोईनउद्दीन उर्फमोईनमिया मुस्लिम समाज धर्मगुरूरमजान महिना सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होत आहे, याबाबत समाधानी आहे. वार्षिक सुट्टया सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.- आशरीन राऊत नगरसेविका, ठामपारमजानच्या महिन्यांमध्ये मतदान आले असते तरी फरक पडला नसता. जेथे रमजान महिन्यात मतदान होणार आहे, त्या राज्यातील काही जण विनाकारण तारखांबाबत वाद निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात रमजानपूर्वी मतदान होत आहे, ही समाधानाची बाब आहे. - परवेझ खान, सामाजिक कार्यकर्ताराज्यातील मतदानाच्या तारखा योग्यच आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजावून नंतरच त्यांच्या मूळ गावी जावे.- अबू फैसल चौधरी, सरचिटणीस, मिल्ली तारीख संघटना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानMuslimमुस्लीम