शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात लवकरच म्युझिक थेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:37 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना बरे होण्यास मदत व्हावी यासाठी मनोरुग्णालयाच्या वतीने म्युझिक थेरपी सुरू केली जाणार आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे  - प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना बरे होण्यास मदत व्हावी यासाठी मनोरुग्णालयाच्या वतीने म्युझिक थेरपी सुरू केली जाणार आहे. पुण्यातील मनोरुग्णालयात हा उपक्रम सुरू असून त्या धर्तीवर येथेही हा प्रयोग करणार असल्याचे अधीक्षक संजय बोदाडे यांनी लोकमतला सांगितले.ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्या १४०० हून अधिक मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम येथे राबविले जातात. त्यात भर म्हणून म्युझिक थेरपी सारखा उपक्रम मनोरुग्णालयाने हाती घेतला आहे. औषधोपचारांच्या व्यतिरिक्त म्युिझक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांचा मानसीक आजार बरा करणे हा त्यामागचा उद्देश आहे. रोट्रॅक्ट क्लब आॅफ एस. के. सोमैय्या यांच्या पुढाकाराने व ताओ साऊण्ड स्पा यांच्या सहकार्याने हा उपक्रम होईल. सुरुवातीला मनोरुग्णालयातील स्टाफला ही थेरपी दिली जाणार आहे. जेणेकरुन त्यांचाही मानसिक ताण कमी होईल असे साऊण्ड थेरपीस्ट प्रिती पाटील यांनी सांगितले. स्टाफनंतर १५ मनोरुग्णांचा पायलट ग्रुप तयार केला जाणार आहे. जे मनोरुग्ण सूचना ऐकतील अशाच मनोरुग्णांना आधी ही थेरपी दिली जाईल. यात साऊण्ड हिलींग्सच्या माध्यमातून त्यांना स्पंदनांचा अनुभव दिला जाणार असून त्यासाठी वेगवेगळ्या साऊण्ड टुल्सचा वापर होणार आहे. आठ ते दहा दिवस हा प्रयोग केल्यानंतर या रुग्णांवर कसा आणि काय परिणाम होतो याची पडताळणी केली जाईल. याचा सकारात्मक परिणाम मिळाला की याच १५ रुग्णांना महिनाभर ही थेरपी पुन्हा दिली जाईल, त्यानंतर हळूहळू उर्वरित रुग्णांना यात सहभागी करून घेतले जाणार अशी माहिती त्यांनी दिली.हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर केला जाणार आहे. त्यातून काय रिझल्ट मिळतो हे पाहून नियमित थेरपी सुरू होईल.- संजय बोदाडे, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :musicसंगीतnewsबातम्या