शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

म्युज्यू दो अमाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 06:15 IST

ब्राझीलमधील म्युजू दो अमाना ही वास्तू अशाच प्रवासाची उकल करण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे.

कौस्तुभ कुर्लेकर|

आरंभाचा शोध आणि अंताबद्दलचे कुतूहल मानवी मनाला सातत्याने कोडे घालते. या प्रश्नाचे आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक कलावंत करीत असतो. ब्राझीलमधील म्युजू दो अमाना ही वास्तू अशाच प्रवासाची उकल करण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. तिच्या पाच प्रदर्शनांतून उलगडतो जगण्याचे गूढ शोधण्याचा प्रवास...म नुष्याला नेहमी आपण कोण आहोत, आपण कुठून आलोत आणि पुढे कुठे पोहोचणार आहोत, हे प्रश्न नेहमी पडत असतात. काही वास्तू या आपल्याला नेहमी पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मदत करतात. अशाच सर्व प्रश्नांना स्पर्श करत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न म्युझियम आॅफ टुमारो (म्युज्यू दो अमाना) यास्वरूपात ब्राझीलमधील रिओ-द-जानेरो या राजधानीच्या शहरात पियर माऊआ या भागात केला आहे.म्युज्यू दो अमाना हे पोर्टो मारिविल्हे या रिओ-द-जानेरोमधील बंदराच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पामुळे हा परिसर सर्वात आकर्षक परिसर बनला आहे.स्पॅनिश वास्तुविशारद सांतियागो कॅलट्रावा यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे संग्रहालय कॅरिओका संस्कृतीवर (ब्राझीलमधील मूळ संस्कृती) आधारित आहे. कॅलट्रावा यांनी या वास्तूची रचना करताना पाण्यावर तरंगणाºया जहाजाप्रमाणे किंवा भरारी घेणाºया पक्ष्याप्रमाणे अलौकिक अशा स्वरूपात मांडणी केली आहे.एकूण १५ हजार चौरस मीटर क्षेत्र असलेल्या या संग्रहालयात मुख्य पाच प्रकारची प्रदर्शने आहेत. ज्यात कॉसमॉस, अर्थ, टुमारो, अ‍ॅण्थ्रोपोकिन व अस या दृक्श्राव्यस्वरूपात मानववंशाचा इतिहास आणि भविष्यकालीन वाटचाल मांडली आहे. यामध्ये अभ्यागतांना २७ प्रकारचे प्रयोग करता येतात व ३५ प्रकारचे अनुभव घेता येतात. संग्रहालयाचा दर्शनी ७५ मीटर लांबीचा भाग हा कॅण्टीलिव्हरस्वरूपात बांधण्यात आला आहे. संग्रहालयाभोवती तलाव तयार करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक अशा नैसर्गिक प्रकाश, सौरऊर्जा इत्यादी गोष्टींचा समावेश या वास्तूत केला आहे. याव्यतिरिक्त संशोधनासाठी प्रयोगशाळा, शैक्षणिक कार्यक्र मासाठी ४०० लोक बसू शकतील, असे सभागृह, उपाहारगृह इत्यादी व्यवस्थाही तेथे आहे.एकंदर रचना पाहता म्युज्यू दो अमाना म्हणजेच म्युझियम आॅफ टुमारो ही अनोखी वास्तू मानवाला पडणाºया प्रश्नांची उकल करण्यात बºयाचअंशी सफल होते.

टॅग्स :tourismपर्यटन