मुंब्रा : शनिवारी सकाळी मुंब्र्यातील मित्तल मैदानाजवळील नाल्याच्या बाजूला मिळालेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून, गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन हत्या करून फेकून दिलेल्या या मृताचे नाव अहमद शेख (३८ वर्षे) असे आहे. तो कौसा भागातील शिमला पार्क परिसरात असलेल्या एका सभागृहामागच्या इमारतीमध्ये राहत होता. त्याची हत्या करण्यात आली त्यावेळी तो तेथे कशासाठी गेला होता, तसेच त्याची हत्या कुणी व का केली याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर.बी. वळतकर यांनी लोकमतला दिली.
हत्या केलेल्या मृतदेहाची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:48 IST