शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इन-रिलेशनशिप राहणाºया महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:35 IST

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या डॉली फ्रॉन्सिस रॉड्रिक्स (३७) हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय चंद्रकांत मळगावकर (४०) याने तिची गळा दाबून हत्या

ठाणे : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या डॉली फ्रॉन्सिस रॉड्रिक्स (३७) हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय चंद्रकांत मळगावकर (४०) याने तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना वर्तकनगर परिसरात घडली. हत्येनंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याने ही घटना उघडकीस आली. तसेच विजय याने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिठ्ठी लिहून तक्रार केली असून तशी एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.वर्तकनगर, दोस्ती विहार येथील पाचव्या मजल्यावर राहणारी मयत डॉली आणि आरोपी विजय हे मागील १३ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतात. विजय हा विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. कोपरी पूर्व येथे एका ठिकाणी त्या दोघांची १३ वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याचदरम्यान, पत्नी आणि मुलाला सोडून तो डॉलीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला होता. मूळ दोघेही गोव्याचे राहणारे असून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना त्यांना एक मुलगा झाला. याचदरम्यान, डॉली हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण विजयला लागल्यानंतर दोघांमध्ये हळूहळू खटके उडू लागले. त्यातूनच, डॉली एप्रिल महिन्यात ६ वर्षांचा मुलगा घेऊन गोव्याला आईकडे गेली. तसेच ती त्याला गोव्याला ठेवून जून महिन्यात पुन्हा ठाण्यात त्याच्याकडे आली. दरम्यान, विजय याच्या मनात संशयाने चांगलेच घर केले होते. त्या संशयावरून आलेल्या रागातून त्याने तिची शुक्रवारी घरात दोन्ही हाताने गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर काही तासांतच त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला. त्यानुसार, वर्तकनगर पोलिसांनी पाहणी करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती दिली.तक्रार करण्यासाठी दिल्ली गाठलीविजय याला डॉलीचे अन्य दोघांबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर तो तिचा रागराग करू लागला. तरीसुद्धा ते एकत्र राहत होते. याचदरम्यान, त्याने जुलै महिन्यात तिची तक्रार पंतप्रधान मोदी यांना चिठ्ठीद्वारे केली. ती चिठ्ठी त्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान कार्यालयात दिली. तशी एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.