शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अपहृत मुलाची खंडणीसाठी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:51 IST

शहरात धामणकरनाका, विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गाजवळ पाइपलाइनमध्ये आढळला.

भिवंडी : शहरात धामणकरनाका, विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गाजवळ पाइपलाइनमध्ये आढळला. याप्रकरणी पोलिसांनी वाहीद अन्सारी (२०) या तरुणास अटक केली आहे. दुसरा आरोपी आपल्या कुटुंबासह शहरातून पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.बिलाल शकील कुरेशी (१४) असे अल्पवयीन मुलाचे नाव असून तो निजामपूरमधील कुरेशीनगरमध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो गेल्या रविवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत धामणकरनाकामधील बीफच्या दुकानात आला होता. दुपारी १२ च्या सुमारास अचानक तो दुकानातून गायब झाल्याने बिलालची शोधाशोध सुरू झाली.तो कुठेही न सापडल्याने त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात बिलाल याचे अपहरण झाल्याची तक्रार केली. दरम्यान, त्याच्या वडिलांना मोबाइलवरून पाच लाखांची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता.गुरुवारी रात्री बिलालची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला असता मुंबई-नाशिक महामार्गावरील पाइपलाइनजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या गळ्याला रस्सी आवळून डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

टॅग्स :Murderखूनbhiwandiभिवंडी