शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेकरिता सोनसाखळीसाठी १४ वर्षीय मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

सोहम बजागे (वय १४ वर्षे) हे मृत अल्पवीयन मुलाचे नाव आहे. अक्षय वाघमारे (वय २४ वर्षे) आणि त्याचा अल्पवयीन ...

सोहम बजागे (वय १४ वर्षे) हे मृत अल्पवीयन मुलाचे नाव आहे. अक्षय वाघमारे (वय २४ वर्षे) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या प्रकरणात आरोपी आहेत. सोहम हा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगरमधील साईराम रेसिडेन्सी येथील इमारतीत कुटुंबासह राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपींनी सोहमला मोर दाखविण्याच्या बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यास सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आवळून हत्या करून त्याच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोनसाखळी काढली. आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघांनीही सोहमची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे दहा हजार रुपयात गहाण ठेवली. या पैशातून आरोपी उसणे पैसे फेडणार होता. उरलेल्या पैशातून तो मौजमजा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा कुटुंबाने शोध घेतला. विशेष म्हणजे आपल्यावर संशय येऊन नये म्हणून या आरोपींनीही कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये आढळून आला. या घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून सोहमचा मृतदेह विच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. नातेवाइकांनी दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघा मित्रांना पडघा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. सोहमच्या हत्येच्या ३ ते ४ दिवसांपूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळीमधील लॉकेट विकून मौजमजा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.