शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका घेणार १८ भूखंड ताब्यात

By admin | Updated: December 14, 2015 01:12 IST

महापालिकेने विकसित करण्यासाठी दिलेले भूखंड ताब्यात घेऊन रूंदीकरणातील बाधितांना वसवा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे

उल्हासनगर : महापालिकेने विकसित करण्यासाठी दिलेले भूखंड ताब्यात घेऊन रूंदीकरणातील बाधितांना वसवा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर भूखंडाची यादी टाकून त्यावरील मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पालिकेवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. उल्हासनगर पालिकेने १५ वर्षापूर्वी १८ आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी बिल्डरांना दिले होते. अटी-शर्तीनुसार भूखंडावरील विकसित २५ टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत केली नाही. रस्ता रूंदीकरणातील बाधितांना पालिका इंदिरा गांधी मार्केटऐवजी भूखंडावरील विकसित मालमत्तेवर वसविण्याची मागणी पुढे आली आहे. बिल्डर तसेच स्थानिक नगरसेवकात साटेलोटे असल्याने पालिका मालमत्ता ताब्यात घेत नसल्याचा आरोप होत आहे. महापालिका मालमत्ता विभागाने तीन महिन्यांपूर्वी बिल्डरांना नोटीसा पाठवून मालमत्ता हस्तांतरीत करा अथवा आपले म्हणणे एका आठवडयात मांडण्याचे सूचविले होते. मात्र राजकीय दबाव आल्याने ही प्रक्रिया बंद पडल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या एल्गाराने पुन्हा मालमत्ता ताब्यात घेंण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, पालिकेच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मागणीने वर्षानुवर्ष बिल्डराकडे पडून असलेल्या मालमत्तेचे प्रकरण उघड झाले आहे. बिल्डर व संबधित नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. अनेकदा भूखंडावरील विकसित मालमत्ता ताब्यात घेण्याचा विषय महासभेत आला होता. मात्र त्यानंतर गायब झाला, याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. मालमत्ता गैरवापराबद्दल बिल्डरावर गुन्हे दाखल करून भाडे वसुलीची मागणी आहे.