शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा लागण, तर कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:36 IST

ठाण्यात कोरोनाचा शनिवारी आणखी एक बळी गेला आहे. तर आता कोरोना बाधीत रुग्णांसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाचा लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन दिवस रात्री डोळ्यात तेल टाकून काम करीत आहे. मात्र आता महापालिकेच्या परवाना विभागातील कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ५७ वर्षीय रुग्ण हॉराईजन या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता.                         ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात गुणाकाराने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. कधी पाच तर कधी १०, १५, २० अशा संख्येने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. आजच्या घडीला कोरोनाचे शहरात १२० च्या आसपास रुग्ण आहेत. तसेच होम क्वॉरान्टाइन केलेल्या रुग्णांच्या संख्याही शेकडोत आहे. तर पालिकेच्या विलीगकरण कक्षातही १०० हून अधिक नागरीक वास्तव्यास आहेत. दुसरीकडे एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संबधीत ठिकाणचा जवळ जवळ एक किमीचा परिसर सील केला जात आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरन्टाइन केले जात आहे. अशा प्रकारे दिवस रात्र हे काम महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. आता काही अधिकाºयांनी आपल्या कोरोनाच्या चाचण्या देखील केल्या आहेत. परंतु सुदैवाने त्या निगेटीव्ह आल्या आहेत. असे असतांनाच आता परवाना विभागातील एका कर्मचाºयालाच आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली आहे. हा कर्मचारी पालिका मुख्यालयातील परवाना विभागात कामाला होता. त्यामुळे आता पालिकेच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला असून विभागातील इतर कर्मचाऱ्याचीही आता तपासणी करण्याची तयारी पालिकेने केली आहे.दरम्यान दुसरीकडे ठाण्यात शनिवारी आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु ाल्याची मााहिती पालिकेने दिली आहे. गार्डन इस्टेट या भागात हा रुग्ण वास्तव्यास होता. त्याच्यावर हॉराईझन रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यु झाला. त्यांना यापूर्वी अर्धांगवायुचा झटका येऊन गेला होता. तर ठाण्यात आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. तर १२० च्या आसपास नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या