शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकारी - कर्मचा-यांना समज द्या, वाहतूक पोलिसांनी धाडले महापालिकेस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:37 IST

मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.

धीरज परब मीरारोड - कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात रस्त्यांवर नेहमीसारखी वाहतूक कोंडी नसते. तरी देखील वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने सरकारी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना बंदी आहे. त्यामुळे शहरात एरव्ही होते तशी वाहतूक कोंडी नसते. तसे असले तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा वाहनांवर नियमित कारवाई केली जात आहे. ठाणे ग्रामीण वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी या बाबतचे लेखी पत्रच महापालिकेस दिले आहे. त्यात पवार यांनी म्हटले आहे की, वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतुक पोलीसां कडुन कारवाई दरम्यान महापालिकेचे अनेक कर्मचारी विना हेल्मेट आढळतात. महापालिकेची व ठेक्यावरची लहान - मोठी वाहने चालवताना देखील सीट बेल्ट न बांधणे, सिग्नल तोडणे तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.  त्यांना पोलिसांनी पकडले की ते कर्मचारी, आम्ही पालिकेचे कर्मचारी असून पालिकेचे काम करतो असे सांगतात. तुम्ही आमच्यावर कारवाई करू नका असे सांगून पोलिसांसोबत वाद घालतात. सदर प्रकार सरकारी कर्मचा-यांना शोभणारा नाही. अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेत देखील कारवाईदरम्यान पोलीस पक्षपात करतात, असा संशय होऊन नाराजी वाढते. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात यावी, असे पवार यांनी पालिकेला कळवले आहे.