शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मर्जीतील कंत्राटदारांवर पालिका अधिकारी मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:37 IST

केडीएमसीच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईसाठी आलेल्या कमी दराच्या निविदा नाकारून अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदारांच्या निविदा मंजूर केल्या आहेत.

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईसाठी आलेल्या कमी दराच्या निविदा नाकारून अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदारांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी केलेला खुलासा समितीला मान्य झाला नाही. अखेरीस सभापती राहुल दामले यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.राजेश कन्स्ट्रक्शन यांनी इतर निविदाधारकांच्या तुलनेत तीन लाखांपेक्षा कमी दराची नालेसफाईची निविदा भरली होती. मात्र, राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीने पॅनकार्डची प्रत स्वसाक्षांकित केलेली नव्हती. त्यामुळे त्यांची निविदा रद्द केली. हे कारण किरकोळ होते. निविदा रद्द करताना प्रशासनाने त्यांना संधी दिली होती का, अशी विचारणा शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे यांनी केली.त्यावर कोलते म्हणाले, राजेश कन्स्ट्रक्शन यांनी निविदेबरोबर पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत अपलोड केली नव्हती. निविदेतील अटीशर्तींप्रमाणे व राज्य सरकारने निविदाप्रकरणी दिलेल्या आदेशानुसार राजेश कन्स्ट्रक्शनची निविदा रद्द केली आहे. निविदा समितीत चार सदस्य असतात. त्यापैकी तीन सदस्यांनी ज्या निविदाधारकांची निविदा मंजूर करण्याचा निर्णय दिला, त्याला अनुसरून मी संबंधितांची निविदा मंजूर केली आहे. त्यात महापालिकेचे नुकसान करण्याचा कोणाच हेतू नाही. मी नियमाला धरूनच काम केले आहे.मात्र, कोलते यांच्या खुलाशावर दामले यांचे समाधान झाले नाही. कोलते चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोलते यांनी कमी किमतीच्या निविदा नाकारण्यात जी तत्परता दाखवली, तीच तत्परता त्यांनी अमृत योजनेंतर्गत २७ गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रकरणात का दाखवली नाही, असा सवाल केला. तसेच लेखापरीक्षक विभागातील अधिकाºयांना याविषयी खुलासा करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले की, अपात्र ठरवलेल्या कंत्राटदाराला संधी देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना ती दिलेली नाही. त्यामुळे दामले यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, कोलते यांनी निविदा अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी कोलते यांना याच मुद्यावर फैलावर घेत चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला. अपात्र निविदाधारक न्यायालयात गेल्यास नालेसफाईचे काम अडचणीत येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली. निविदा समिती ही वादात सापडली आहे. नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करायची आहे. हे काम पाच कोटी ५० लाख रुपये किमतीचे आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका