शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयाची लिफ्ट पाच दिवसांपासून बंद, गर्भवती महिला, गंभीर रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 12:14 IST

चादरीची झोळी करून नेतात दुसऱ्या मजल्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील महापालिका रुग्णालयाची लिफ्ट गेले पाच दिवस बंद असल्यामुळे गर्भवती महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णांना उचलून पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत न्यावे व आणावे लागत आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर भागात भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर अपघात विभाग,  पहिल्या मजल्यावर ओपीडी, डायलिसिस, प्रसूतिगृह, पॅथॉलॉजी लॅब आहे. दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, गरोदर महिलांची ओपीडी आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोफत प्रसूती व उपचार होत असल्याने मोठ्या संख्येने गरजू महिला तसेच सर्वसामान्य रुग्ण पालिका रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी येतात. रुग्णालयाची इमारत असतानाही केवळ एकच लिफ्ट बसवण्यात आली आहे. सदर लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका खाजगी ठेकेदारास दिलेला आहे. मात्र गेल्या शनिवारपासून लिफ्ट बिघडल्याने बंद अवस्थेत आहे. लिफ्ट बंद असल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालत जाणे - खाली उतरणे गर्भवती महिला, डायलिसिसच्या रुग्णांसाठी अतिशय जिकिरीचे बनले आहे. जिने चढून जाणे रुग्णांना व गर्भवती महिलांना शक्य होत  नाही.

रुग्णांना खुर्चीवर बसवून नेतात..  काही महिला व रुग्ण कसेबसे जिने चढून वर जातात. मात्र ज्यांना जिने चढणे अजिबात शक्य होत नाही त्यांना रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांचे नातलग हे खुर्चीवर बसवून किंवा स्ट्रेचरने,  चादरीत ठेवून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नेतात. अशा पद्धतीने गर्भवती महिला व रुग्णांना ने-आण करताना अपघाताची शक्यता असते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल