शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:32 IST

उल्हासनगर मनपा : सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

उल्हासनगर : शासनाच्या आदेशानंतरही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याच्या निषेधार्थ, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी ७ जानेवारीपासून कामबंदचा इशारा दिला. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मग पालिका कर्मचाऱ्यांना का नाही, असा प्रश्न साठे यांनी उपस्थित केला.

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशान्वये सातवा वेतन लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. डिसेंबर महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी महापालिकेला केली. मात्र, डिसेंबर महिना संपत आल्यावरही पालिकेकडून काहीही हालचाल न झाल्याने, संतप्त झालेल्या साठे यांनी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला व तसे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेत शासन नियुक्ती अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग, तर महापालिका कर्मचारी वंचित, असे चालणार नसल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी उत्पन्न वाढवून, कर्मचाऱ्यांवरील वेतनावर ३५ टक्केपेक्षा कमी खर्च करणे आदी अनेक सूचनाही कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. ७ जानेवारीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू न केल्यास, कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या प्रकाराला आयुक्तांसह महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा राधाकृष्ण साठे यांनी दिला. साठे यांनी सोमवारी महापालिका प्रांगणात कर्मचारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत विचारविनिमय करणार असल्याचे सांगितले. अनेक कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.  रम्यान, उल्हासनगर पालिकेत भाेंगळ कारभार सुरु असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक विभागांचा कारभार हा कनिष्ठांवर साेपविल्याने गाेंधळ उडाला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर