शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणूक एकत्रितच लढवावी

By admin | Updated: June 23, 2016 03:06 IST

सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे

भार्इंदर : सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप दोन्ही पक्षांनी थांबवून एकत्रित निवडणूक लढवावी, असा सल्ला रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मिरा-भार्इंदर शहर (जिल्हा) अध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह इतर पालिका निवडणुकीत सेना-भाजपाने युती तोडून स्वतंत्र लढल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल. आघाडी सरकारमध्ये एकमेकांवरील कुरघोडींसह त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच नागरिकांनी त्यांना नाकारले. तशी परिस्थिती स्वतंत्रपणे लढल्यास सेना, भाजपाची होऊ नये यासाठी एकत्र लढणे आवश्यक आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत रिपाइचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत त्यांनी दलितांना सत्तेत वाटा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपाच्या विजयासाठी रिपाइने केलेल्या सहकार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केंद्रात मंत्रीपद देणार अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मंत्रिमंडळासह महामंडळात रिपाइला दहा ऐवजी पाच टक्के वाटा मिळावा. केंद्र सरकारबाबत बोलताना त्यांनी युती तुटल्यास भाजपा सरकार अल्पमतात येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेवेळीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय रिपाइसुद्धा भाजपासोबतच राहणार असल्याने सेनेने पाठिंबा काढला तरी फरक पडणार नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीतही सेना, भाजपा युती झाली नाही तर भाजपा, रिपाइ युती नक्की होईल, असा दावा केला. (प्रतिनिधी)