शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अन् प्रभाग सुधारणा निधी झाला दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:30 IST

मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधीला सपशेल कात्री लावली होती.

- अजित मांडके ठाणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधीला सपशेल कात्री लावली होती. परंतु, नगरसेवकांना मागील वर्षीप्रमाणे यंदाही नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी दुप्पट करून घेतला आहे. मागील वर्षी ५५ लाखांचा निधी मिळाला होता. यंदा तो ८० लाखांवर गेला आहे. तर, चार महिने रखडलेले अंदाजपत्रकसुद्धा आता मार्गी लागले असून यावर महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तर, आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात ३४४.१३ कोटींची वाढ केल्याने ते आता ४०३९.२६ कोटींच्या घरात गेले आहे. महापालिकेचे २०१७-१८ चे ३०४७.१९ कोटींचे सुधारित आणि २०१८-१९ चे ३६९५.१३ कोटींचे मूूळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्चमध्ये महासभेला सादर केले होते. परंतु, नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी शून्य ठेवला होता. दरम्यान, अर्थसंकल्पीय विशेष महासभेच्या चर्चेच्या वेळेस प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधी हा प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक कोटीचा देण्याचे प्रस्तावित केले होते. परंतु, मागील वर्षीही अशाच प्रकारे मागणी केली होती. त्यानंतर, प्रशासनाने नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी मिळून ५० ते ५५ लाखांपर्यंत नेला होता. आता यात दुप्पट वाढ करण्याची मागणी नगरसेवकांनी केल्याने उत्पन्न आणि खर्चाशी त्याचा ताळमेळ बसवून त्यानुसार तरतूद केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. याच मुद्यावरून अंदाजपत्रक मंजुरीस विलंबसुद्धा होत होता.>काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनीही १५ दिवसांत अंदाजपत्रक मंजूर न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर, तातडीने हालचाल होऊन अंदाजपत्रकावर एकमत झाले. ३४४.१३ कोटींची वाढ सुचवून ते मंजूर केले आहे. त्यामुळे आता २०१८-१९ चे अंदाजपत्रक हे आता ४०३९.२६ कोटी रुपयांवर गेले आहे.नगरसेवक निधी ३० लाख आणि प्रभाग सुधारणा निधी ५० लाख असे मिळून प्रत्येक नगरसेवकाला ८० लाखांचा निधी मिळणार आहे. यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी जोर लावल्याने आणि इतर ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर नगरसेवकांची चांदी झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे