शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा रूद्रावतार

By admin | Updated: April 26, 2017 00:22 IST

शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे.

उल्हासनगर : शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे. गळक्या वाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी नाल्यात जात आहे. पालिकेकडे जलवाहिनी दुरूस्तीची अद्ययावत यंत्रणा नसल्याचे उघड झाले. उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांवर एका हंडयासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहराला एमआयडीसी कडून दररोज १२० एमएलडीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असून लोकसंख्या सहा लाख गृहीत धरली आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला रोज १२० लिटर पेक्षा जास्त पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शहराची परिस्थिती वेगळी असून पालिकेला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शहराला आठवडयातून दोन दिवस तेही अपुरे पाणी मिळत आहे. या प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन महासभा पाणीटंचाईवरून गाजत असून हजारो नागरिकांना हातपंपाचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.राष्ट्रीय मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी गृहीत धरले आहे. तर मुंबईसारख्या मोठया शहराला प्रत्येक व्यक्तीमागे ५० ते ६० लिटर दिवसाला पाणी मिळते. याउलट शहराची स्थिती असून पाणीपुरवठा व लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीला २०० लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने शहरातील पाणीवितरण योजना, पाणी गळती, ठप्प पडलेली ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहरातील पाणी वितरणातील दोष कारणीभूत असल्याचे सांगितले. तसेच बेकायदा नळजोडणी व पाणीगळती साठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुख्य जलवाहिनीवर विनापरवाना घेतलेल्या नळजोडणीधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बेकायदा जोडणीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)