शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला महापालिका देणार २० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:46 IST

मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्रासाठी ठाणे महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याची तयारी पालिकेने केली आहे.

ठळक मुद्देइतर सुविधाही पुरविल्या जाणारजादा शिक्षक नियुक्ती करण्याची डावखरे यांची कुलगुरुकंडे मागणी

ठाणे - मुंबई विद्यापीठाच्याठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी केली. उपकेंद्राला निधी देण्याबरोबरच आणखी सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.                    कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानुसार, मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अडचणी सोडविण्याबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी प्र-कुलगुरु डॉ. नरेशचंद्र, डॉ. अजय भामरे, उपकेंद्राचे प्रभारी चंद्रशेखर मराठे आदी उपस्थित होते. ठाणे उपकेंद्रात बीबीए, एलएलबी व बीएमएस, एमबीए अभ्यासक्र म सुरु असून ३५० हून अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए, एलएलबी अभ्यासक्र मासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्द्यासंदर्भात आमदार डावखरे यांनी उपकेंद्राला १९ आॅक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यावेळी उपकेंद्रातील गैरसोयी त्यांच्या समोर आल्या होत्या. त्यांनी याबाबत प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाकडे काही प्रश्न प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले होते. उपकेंद्राकडे जाणारा रस्ता, टीएमटी बससेवेची अपुरी संख्या, विद्यापीठाकडे जाण्यासाठी दिशानिर्देश करणारे फलक आदींबाबत चर्चा झाली होती. या प्रश्नांसंदर्भात डावखरे यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महापालिकेत ही बैठक घेण्यात आली.                 त्यानुसार उपकेंद्रात आणखी एक इमारत उभारण्यासाठी २० कोटी रु पयांचा निधी दिला जाईल. उपकेंद्राच्या इमारतीची ओसी, टीएमटी बससेवेच्या वाढीव फेऱ्या, उपकेंद्राकडे जाण्यासाठी पक्का रस्ता, दिशादर्शक फलक आदींचे काम सुरू केले जाईल असेही सांगितले. या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिल्याची माहिती डावखरे यांनी दिली.जादा शिक्षक नियुक्तीचाआग्रहठाणे येथील उपकेंद्रात शिक्षकांच्या अपुºया संख्येमुळे अडचणी येत असल्याकडे आमदार डावखरे यांनी कुलगुरु पेडणेकर यांचे लक्ष वेधले. तसेच जादा शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केली. त्यावेळी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाuniversityविद्यापीठ