शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नागरिकांची विचारपूस करणाऱ्या एका फोनसाठी महापालिकेचा १५ रुपये खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविताना त्रस्त झालेल्या ठाणेकरांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर ...

ठाणे : कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविताना त्रस्त झालेल्या ठाणेकरांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर घरातच थांबलेल्या रुग्णांची केवळ एका फोनवर विचारपूस व सल्ला देण्यासाठी ठाणे महापालिका प्रतिकॉल १५ रुपये मोजणार आहे. रोज सहा हजार फोन कॉलचे कंत्राट महापालिका प्रशासनाने दिले असून, कॉल सेंटर कंपनीला ५४ लाख रुपये दिले जाणार आहेत. या कॉल सेंटरसाठी महापालिकेनेच सात लाख रुपये खर्चून चार डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. दरम्यान, कॉल सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या उधळपट्टीला भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी तीव्र विरोध केला आहे.

कोविडची दुसरी लाट ओसरत आली आहे. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेचाही ठाणेकरांना तडाखा बसला. प्रत्येक रुग्णाला बेड देण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरले. भरलेले ग्लोबल हॉस्पिटल, ऑक्सिजनअभावी रिकामे पार्किंग प्लाझा हॉस्पिटल, कर्मचाऱ्यांअभावी सुरू न झालेले व्होल्टास व कळवा भूमिपुत्र हॉस्पिटल अशी परिस्थिती ठाण्याने पाहिली. मात्र, आता कॉल सेंटरमधून होम क्वारंटाईन रुग्णांची काळजी घेण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून ६१ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. होम क्वारंटाईन, को-मॉर्बिड रुग्ण, कोरोनामधून बरे झालेले रुग्ण आणि लस घेतलेल्या नागरिकांची कॉल सेंटरमधून विचारपूस सुरू करण्यात आली आहे. त्यांना गरजेनुसार डॉक्टरांकडून सल्ला दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रतिकॉल १५ रुपये मोजणार आहे. रोज सहा हजार फोन कॉलद्वारे कॉल सेंटर कंपनीला दररोज ९० हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत. एकूण ५४ लाख रुपये कंपनीच्या तिजोरीत जाणार आहेत. या कॉल सेंटरच्या कंपनीवर महापालिका प्रशासनाने कृपादृष्टी ठेवली असून, कॉल सेंटरवरून सल्ला देण्यासाठी महापालिकेनेच चार डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासाठी सात लाख २० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. अशा प्रकारे अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ६१ लाख रुपयांची उधळपट्टी महापालिका करणार आहे, असा आरोप त्यांनी केला.

.....................

कॉल सेंटरसाठी डॉक्टर उपलब्ध कसे?

डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेने हॉस्पिटल सुरू केले नव्हते. ग्लोबल हॉस्पिटलमध्येही डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. अशा परिस्थितीत कॉल सेंटरसाठी चार डॉक्टर कसे उपलब्ध झाले, असा सवाल डुंबरे यांनी केला आहे. एका फोन कॉलसाठी १५ रुपये दर आकारणाऱ्या कॉल सेंटरलाच डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अट का टाकण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

.....................

तिजोरीत खडखडाट, पण गांभीर्य नाही

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नाहीत. मात्र, महापालिका प्रशासनाला आर्थिक स्थितीचे गांभीर्य नाही. त्यामुळेच एका फोन कॉलसाठी १५ रुपये दर ठरवून ५४ लाख रुपये खर्चाच्या उधळपट्टीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्यांना परस्पर मंजुरीही दिली जात असून, केवळ महासभेत प्रस्ताव मांडण्याची औपचारिकता केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

..................हेल्पलाईन नंबर सुरू केल्यास लाखो रुपयांचा खर्च वाचेल

ठाण्यातील ज्या नागरिकांना डॉक्टरांच्या तातडीने सल्ल्याची आवश्यकता आहे, त्या रुग्णांसाठी महापालिकेने २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. या हेल्पलाईनवर फोन केल्यास नागरिकांना तातडीने मदत पाठविता येईल. त्याचबरोबर महापालिकेचा किमान ५० लाख रुपयांचा खर्चही वाचेल, अशी सूचना डुंबरे यांनी केली आहे. ठाण्यातील रुग्णांच्या मदतीसाठी प्रभाग समिती स्तरावरील डॉक्टरांचे क्रमांकही जाहीर करावेत. त्याचबरोबर मोफत सल्ला देण्याची इच्छा असलेल्या सेवाभावी डॉक्टरांनाही हेल्पलाईनला जोडता येईल, अशी सूचना डुंबरे यांनी केली आहे. एकीकडे वॉर रूमसारखी सक्षम यंत्रणा उभारल्याबद्दल महापालिका प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. दुसरीकडे, कॉल सेंटरसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. वॉर रूममार्फत सहजपणे रुग्णांना सल्ला देण्याचे काम होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.