शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कंत्राटदाराची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:59 IST

महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधवने रविवारी दुपारी स्वत:वर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रचंड नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे.

ठाणे : महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधवने रविवारी दुपारी स्वत:वर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रचंड नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे.पाचपाखाडी येथील ३६ वर्षीय रहिवासी जाधव हे महापालिकेमध्ये कंत्राटदार आहेत. रविवारी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास गायमुखजवळ त्यांचा मृतदेह स्वत:च्या कारमध्ये आढळला. पोलिसांनी कारची काच फोडून जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड आर्थिक अडचणीत होते. महापालिकेच्या कामांचे ते भागीदारीने कंत्राट घेत होते. काही कामांमध्ये मोठा तोटा झाल्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.गायमुखजवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी होती. कारचे इंजीन आणि एसी सुरूच होते. जाधव यांनी परवाना असलेल्या स्वत:च्या पिस्तुलातून छातीमध्ये तीन गोळ्या झाडून घेतल्या. जाधव चालकाच्या सीटवर बसले होते. त्यांचे पिस्तूल पोलिसांना त्यांच्या पायाजवळच आढळले. प्रथमदर्शनी ही आत्महत्येचीच घटना असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी सांगितले.संकेत जाधव यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. विद्या, मला माफ कर. आयुष्यात मी पार हरलो आहे. गैरसमज करून घेऊ नको, असे जाधव यांनी या चिठ्ठीमध्ये पत्नीला उद्देशून लिहिले आहे. चिठ्ठी केवळ ३ ते ४ ओळींची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा असून मोठा भाऊदेखील आहे.